NCP Activist News: मोठी बातमी! शरद पवारांनीच अध्यक्षपदी राहावं,राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

Sharad Pawar Retirement: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा शरद पवार यांचा निर्णय फेटाळला...
NCP News
NCP NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात पक्षाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र. या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अस्वस्थता पसरली आहे. तसेच राजीनामा मागे घ्यावा यासाठी असा कार्यकर्ते आजही ठाम आहेत. याचवेळी पवारांनी राजीनामा मागे घ्यावा या मागणीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. याचदरम्यान, मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर एका कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)च्या प्रदेश कार्यालयाबाहेर शुक्रवारी सकाळी एका कार्यकर्त्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र, पोलीस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनाी वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला. यावेळी पोलिसांकडून कार्यकर्त्यांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही कार्यकर्त्यांना वारंवार शांत राहण्याचं आवाहन करत आहेत. मात्र,प्रदेश कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे.

NCP News
NCP New Chief : मोठी बातमी : शरद पवारांचा राजीनामा समितीने फेटाळला ; कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न ; अध्यक्षपदी..

आत्मदहन करण्याचा प्रयत्न...

एकीकडे पक्ष नेत्यांची बैठक सुरू असतानाच पक्षाच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमले होते. या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो… पवारसाहेब… पवारसाहेब… शरद पवार… शरद पवार अशा घोषणा हे कार्यकर्ते देत होते. याचवेळी एका कार्यकर्त्याने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी तेथील इतर कार्यकर्त्यांनी त्याला रोखले आणि मोठा अनर्थ टळला.

राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक प्रदेश कार्यालयात ११ वाजता सुरू झाली. या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करणारा ठराव मांडण्यात आला आहे. हा ठराव सर्वच नेत्यांनी मंजूर केला. या बैठकीला पक्षाचे अनेक वरिष्ठ नेतेमंडळी उपस्थित आहे. या बैठकीत शरद पवारां(Sharad Pawar)च्या अध्यक्षपदावर निर्णय़ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र. या बैठकीदरम्यान, कार्यालयाबाहेर प्रचंड गोंधळांचं वातावरण आहे.

निवृत्त होण्याचा निर्णय फेटाळला

याचवेळी कार्यकर्त्यांकडून शरद पवारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. राष्ट्रवादीच्या सदस्या समितीनं पवार यांनी घेतलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय फेटाळला असल्याची माहिती समोर येत आहे. पवारांनीच अध्यक्षपदी राहावं असा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला आहे.

NCP News
Sanjay Raut on Sharad Pawar Resign: कधी ना कधी निर्णय घ्यावा लागतो पण..; संजय राऊत स्पष्टचं बोलले

या बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, फौजिया खान, धनंजय मुंडे यांच्यासह विविध नेतेमंडळी उपस्थित आहेत. मात्र, शरद पवार अद्यापही या बैठकीला पोहचलेले नाहीत.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com