BJP MP Ravi Kishan : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप खासदार आणि गोरखपूर मतदारसंघातील उमेदवार, अभिनेते रवी किशन यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयाने रवी किशन यांची मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या 25 वर्षीय महिलेने केलेली डीएनए चाचणीची मागणी फेटळली आहे.
याचिका दाखल करणारी महिला शिनोवाने दावा केला होता की, ती रवी किशन यांची मुलगी आहे. तिने न्यायालयाकडे रवी किशन यांची डीएनए चाचणी आणि तिला रवी किशन(Ravi Kishan ) यांची मुलगी घोषित करण्याची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने तिची याचिका फेटाळली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत दावा करण्यात आला होता की, अपर्णा सोनी आणि रवी किशन यांच्यात संबंध होते आणि 1991 मध्ये त्यांनी विवाह केला. परंतु काही वैयक्तिक कारणांमुळे दोघेही प्रदीर्घ काळ एकत्र राहू शकले नाहीत. याचिकेत महिलेकडून दावा करण्यात आला आहे की तिचा जन्म 19 ऑक्टोबर 1998 रोजी झाला होता. परंतु तोपर्यंत हे समजले की रवी किशन हे आधीपासूनच विवाहीत आहेत. याचिकेतून महिलेने मागणी केली होती की, तिची अशी इच्छा आहे की रवी किशन यांनी आता तिला मुलगी म्हणून स्वीकारावे आणि वडील म्हणून त्यांचे नाव तिला द्यावे.
एवढच नाहीतर याचिकाकर्त्या महिलेने हे देखील सांगितले की गरजेच्या काळात दोघांनीही तिची आवश्यक ती काळजी घेतली. याचिकेत आरोप केला गेला आहे की, अशातच जेव्हा शिनोवा आणि सोनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यास रवी किशन यांच्या भेटीसाठी गेल्या, तेव्हा त्यांना चुकीची वागणूक मिळाली आणि भेटही नाकारली गेली.
याप्रकरणी रवी किशन यांची पत्नीने याचिका दाखल करणाऱ्या महिलेविरोधात ब्लॅकमेलिंगची तक्रार दाखल केली होती. रवी किशन यांची पत्नी प्रीती शुक्लाने म्हटले होते की, वर्षभराअगोदरही याच महिलेच्या विरोधात ब्लॅकमेलिंगची तक्रार मुंबई पोलिसात केली होती. निवडणुकीच्या काळात महिलेस आरोप करायला सांगून रवी किशन यांची प्रतीमा मलिन करण्याचे षडयंत्र रचले जात आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.