Kisan Morcha : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मोर्चाला सामोरे जाण्यास सज्ज; दादाजी भूसे, अतुल सावेंवर मोठी जबाबदारी

किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीसह अन्य शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या शेतकरी लाँग मार्चचा (long march) आज (15 मार्च) चौथा दिवस आहे
Atul save | Dadaji Bhuse
Atul save | Dadaji BhuseSarkarnama
Published on
Updated on

Kisan Morcha : शेतकऱ्यांच्या लॉंग मार्च मुंबईत दाखल होत आहे. शेतकऱ्यांच्या या लॉंग मार्चला सामोरे जाण्यासाठी आता राज्य सरकारही तयार झालं आहे. राज्य सरकारमधील शिंदे गटाचे मंत्री दादाजी भूसे आणि भाजप नेते अतूल सावे यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे. दादा भूसे आणि अतूल सावे शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहे. शेतकऱ्यांचा लॉंग मार्च मुंबईत येऊ न देता मुंबई बाहेरच चर्चा करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. त्यांच्या या चर्चेतून शेकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा आहोत. त्यांचं म्हणणं आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवू, आणि जर आमच्याशी बोलून त्यांच समाधान नाही झालं तर त्यांची मुख्यमंत्र्य़ाशी भेट घडवून देऊ, अशी भूमिका मंत्री दादाजी भूसे यांनी मांडली आहे.

Atul save | Dadaji Bhuse
Video: विधानसभेत आमदारांमध्ये राडा ; भाजपच्या आमदारांना मिठाई देण्याचा..

किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीसह अन्य शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या शेतकरी लाँग मार्चचा (long march) आज (15 मार्च) चौथा दिवस आहे. नाशिकमधून लाखोच्या संख्येने निघालेला हा मोर्चा कधीही मुंबईत दाखल होऊ शकतो.दरम्यान,किसान सभेच्या मोर्चात आता वेगळा ट्वि्स्ट आला आहे.

किसान मोर्चा शिष्टमंडळ मुंबईत रवाना होणार नाही तर मुख्यमंत्री आणि सरकारमधील मंत्र्यांनी आमच्याकडे यावे, अशी ठाम भूमिका मोर्चाने घेतली आहे. मोर्चाचे नेते जे पी गावीत (J.P. Gavit) यांनी म्हंटले आहे की, "सरकार सन्मानाने वागणूक देत नाही, आम्ही आता चर्चेसाठी जाणार नाही, सामान्य माणूस ही सरकारला झुकवू शकतो, हे आम्ही दाखवून देणार आहोत."

शेतकऱ्यांच्या वेदनेकडे बघायला सरकारला वेळ नाही, आंदोलक शेतकऱ्यांची उद्विग्नता :

किसान मोर्चा शिष्टमंडळ आणि सरकारचे प्रतिनिधी यांची बैठक पार पडणार होती. मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत होणारी बैठक काल सरकारनकडून रद्द करण्यात आली. आज आंदोलकांनीच या बैठकीत सामील होण्यास नकार दर्शवला. मोर्चा मुंबईत जाणार आहेच, मात्र आता चर्चेसाठी मंत्र्यांनीच आमच्याकडे यावे, असे गावित यांनी भूमिका घेतली आहे. संप करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारने तातडीने प्राधान्य दिले, मात्र शेतकऱ्यांच्या वेदना सरकारला कळत नाही, शेतकऱ्यांच्या पाहायला सरकारला वेळ नाही, म्हणत आंदोलकांनी रोष व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com