Eknath Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे 'फुल फार्मात'; भाजपचे 'ते 70' एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल

70 BJP Workers Join Eknath Shinde Shiv Sena in Vikhroli Mumbai : भाजपच्या 70 कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने महायुतीत नाराजी वाढण्याची शक्यता आहे.
Eknath Shinde Shiv Sena
Eknath Shinde Shiv SenaSarkarnama
Published on
Updated on

BJP workers join Shiv Sena : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. महाविकास आघाडीची आणि महायुतीची खलबतं सुरू आहे. पक्ष संघटनेचा आगामी काळात पाया मजबूत करायचा असल्यास 'स्थानिक'वर कब्जा हवाच, हे लक्षात घेत, सर्व राजकीय पक्षांनी 'स्थानिक'वर लक्ष केंद्रीय केलं आहे.

सत्ताधारी महायुतीमधील सर्वाच पक्षांची प्रवेश घडवून आणण्याची स्पर्धा लागली आहे. परंतु सध्यातरी महायुतीत एकनाथ शिंदेंची शिवसेना 'फुल फार्मात' दिसते आहे. मुंबईतील विक्रोळीत भाजपला पडलेल्या खिंडाराचा फायदा घेत, भाजपच्या नाराज 70 कार्यकर्त्यांचा प्रवेश शिवसेनेत घडवून आणला आहे. एकनाथ शिंदेंच्या या खेळीने महायुतीमधील मोठा भाऊ भाजप नाराजीची शक्यता आहे.

विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या सुमारे 70 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. स्थानिक पातळीवर निष्ठावंतांना डावलून पक्षात नव्याने आलेल्यांना पदे दिल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम ठोकला. महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना भाजपचे पदाधिकारी जाण्याने पक्षाला खिंडार पडले आहे.

विक्रोळी वॉर्ड क्रमांक 118चे भाजप (BJP) अध्यक्ष आणि चित्रपट नाट्य आघाडीचे महासचिव यशवंत कुटे, विक्रोळी विधानसभेचे सहकार आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र धुमाळे, माजी भाजप युवा मोर्चा महामंत्री लक्ष्मण येरम यांच्यासह 70 कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

Eknath Shinde Shiv Sena
Yogendra Yadav On Election Commission : '35 वर्षे मी समर्थन केलं, पण आता नाही'; निवडणूक आयोग विरोधी पक्ष नेत्यालाच धमकावत असल्याचा योगेंद्र यादवांचा आरोप

माजी महापौर आणि शिवसेनेचे नेते दत्ता दळवी तसेच माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी भाजपच्या नाराजांचे शिवसेनेत स्वागत केले. ‘आम्ही स्थानिक पातळीवर पक्ष वाढविला. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला स्थानिक पातळीवर मताधिक्य मिळाले ते आमच्यामुळेच मिळाले, असे असताना पक्षात निष्ठावंतांना डावलले जात असल्याचा आरोप नाराजांनी केला.

Eknath Shinde Shiv Sena
Shirdi Assembly voter scam : मतदार चोरीवरून विखे-थोरात 'आमने-सामने'; थोरातांचा शिर्डीतील मतदार घोटाळ्यावर निशाणा

भाजपची कार्यपद्धती ही वैचारिक आहे. त्यात नियमांना आणि शिस्तपालन खूप महत्त्वाचे असते. परंतु सत्तेत गेलेल्या भाजपला याचाच विसर पडत चालला आहे. बाहेरून येणाऱ्यांना महत्त्वाची पदे दिली जात आहेत. त्यामुळे आम्ही शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचा घणाघात यशवंत कुटे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com