विधान परिषद : भाजपकडून बावनकुळे, महाडिक; पण चित्रा वाघांना संधी नाही

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा भाजपचा निर्णय
Mahadik-Bawankule
Mahadik-Bawankule sarkarnama
Published on
Updated on

दिल्ली : भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली असून नागपूरमधून माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Krishnarao Bawankule) यांना संधी देत त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूरमध्ये अपेक्षेप्रमाणे अमल महाडिक (Amal Mahadeorao Mahadik) यांना गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात उतरविण्यात आले आहे. त्यामुळे कोल्हापूरातील लढत लक्षवेधी ठरणार आहे.

Mahadik-Bawankule
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात भाजपचेही व्यापारी कार्ड

मुंबईतून राजहंससिंह यांना संधी देण्यात आली आहे. येथे चित्रा वाघ यांना उमेदवार मिळण्याची अपेक्षा होती. मात्र तेथे काॅंग्रेसमधून आलेल्या राजहंससिंह यांना उतरविण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील व्होट बॅंकेमध्ये त्यांचा प्रभाव आहे. आगामी महापालिका निवडणुकीत त्यांचा उपयोग करून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

अकोला-बुलढाणा-वाशिम मतदारसंघात वसंत खंडेलवाल यांना उमेदवारी देऊन तेथे शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया यांना कडवी लढत देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. धुळे-नंदुरबारमध्ये विद्यमान आमदार अमरिश पटेल यांना अपेक्षेप्रमाणे संधी मिळाली आहे. येथे पटेल यांच्याविरुद्ध शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी असा सामना होऊ शकतो.

विधानसभेतून निवडून द्यावयाच्या जागेसाठी संजय केणेकर यांचा अर्ज पक्षाने दाखल केला आहे. येथे काॅंग्रेसचे प्रज्ञा सातव यांच्याविरोधात भाजप निवडणूक लढवत आहे. येथे भाजप मागे घेणार का, याची उत्सुकता आहे.

Mahadik-Bawankule
आदित्य ठाकरेंची पसंत : कदम, अहिर यांना डावलले, सुनील शिंदेंना विधान परिषदेत संधी

मुंबई महापालिकेतून दोन जागा विधान परिषदेवर निवडून द्यायच्या आहेत. त्यात शिवसेनेने सुनील शिंदे यांची उमेदवारी दिली आहे. भाजपचे राजहंससिंह व शिंदे हे येथून बिनविरोध निवडून जाणार का, हे पाहावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com