Vidhan Parishad Election 2025: विधान परिषदेसाठी भाजपकडून तीन उमेदवारांची नावे जाहीर

BJP Announces Candidates For Vidhan Parishad Election 2025: भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

येत्या 27 मार्च रोजी विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. दादाराव केचे, संजय केनेकर, संदीप जोशी अशी त्यांची नावे आहेत.

विधान परिषदेच्या पाच आमदारांनी विधान सभा निवडणूक लढवली होती यात त्याचा विजय झाला होता. आता त्यांच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होत आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके व रमेश कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) राजेश विटेकर, शिवसेनेचे आमशा पाडवी यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या पाच जागांसाठी 27 मार्च रोजी निवडणूक आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

BJP
Supriya Sule: शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आउटगोइंग रोखण्यासाठी रणनीती; सुप्रियाताई मैदानात

महाविकास आघाडीच्या एकूण सदस्य संख्येचा आकडा पाहता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता दाट आहे. भाजपने आपले उमेदवार जाहीर केली आहेत. यात दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी यांची नावे चर्चेत होती. त्यांची नावे दिल्लीला पाठवण्यात आली होती. यातील केचे नाव फायनल झाले आहे. त्यांच्यासोबत संजय केनेकर, संदीप जोशी हे आता भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार असतील.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांची यादी आज सांयकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला आलेल्या एका जागेसाठी आज अजित पवारांच्या उपस्थितीत देवगिरीवर बैठक होणार आहे.

तीन नेत्यांना कागदपत्रे गोळा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राष्ट्रवादीकडून झिशान सिद्धकी, संजय दौंड, उमेश पाटील यांना कागदपत्रे जमा करण्याचे यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यापैकी एकाचे नाव फायनल होणार आहे.

शिवसेनेच्या वाट्याला एक जागा आहे, मात्र अनेक जण इच्छुक आहेत.शीतल म्हात्रे, चंद्रकांत रघुवंशी, संजय मोरे, रवींद्र फाटक, किरण पांडव यांच्या नावांची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com