
Pune, 16 March 2025: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरू करण्यात आली आहे. याचाच भाग म्हणून आज पुण्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. बैठकीमध्ये आगामी महापालिका निवडणुकीबाबतचे रणनीती निश्चित करण्यात येणारा असल्याचं सांगितलं जाते.
सध्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील महाविकास आघाडीला गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मित्र पक्षातील नेते महायुतीमध्ये पक्ष प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील देखील काही नेते महायुतीच्या गळाला लागण्याची शक्यता आहे.
त्यामुळे संभाव्य आउटगोइंग रोखण्यासाठी पक्ष संघटना बळकट ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुण्यामध्ये महत्वाची बैठक घेतली आहे. बैठकीला राष्ट्रीय कार्यध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी शशिकांत शिंदे तसेच हर्षवर्धन पाटील आदी नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. सुप्रिया सुळे यादरम्यान उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते आणि आजी-माजी नगरसेवकांची कार्यशाळा देखील घेणार आहे.
या बैठकीत पुणे मनपा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून प्रभाग निहाय आढावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील आजी माजी खासदार -आमदार ,नगरसेवक तथा पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या बैठकीला राहावे, अशा सूचना शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिल्या आहेत.
दरम्यान 2017 पुणे महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. 2017 च्या निवडणुकीत सत्ता परीत वर्तन होऊन भाजपने पुणे महापालिकेची सत्ता काबीज केली. या काळात देखील राष्ट्रवादीचे 40 ते 50 नगरसेवक शहरात होते मात्र दरम्यानच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये फूट पडली आहे. त्याचे दोन भाग झाले आहेत. त्यामुळे मागील महापालिका निवडणूक लढवल्या या उमेदवारांपैकी नेमके आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस किती जण राहिल्या आहेत याबाबतची चाचणी या बैठकीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.