ठाकरे सरकार म्हणजे तीन पैशांचा तमाशा ; शेलारांचा हल्लाबोल

जनतेची कामे होणे अपेक्षीत होते, पण हे सरकार (Uddhav Thackeray) साडेसातशे दिवस पुत्र-पुत्री आणि पुतण्याभोवती फिरत आहे. सरकार जनता केंद्रित होण्यापेक्षा पुत्र, पुत्री, पुतण्या भोवती केंद्रित राहिले,''
Ashish shelar, uddhav thackeray
Ashish shelar, uddhav thackeraysarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्ष झाली. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी राज्य सरकारचा लेखाजोखा मांडला आहे, तर दुसरीकडे भाजप नेते आशिष शेलार (ashish shelar) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत सरकारच्या कामगिरीवर हल्लाबोल केला आहे. पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते.

आशिष शेलार म्हणाले, ''दोन वर्ष राज्यात तीन पैश्यांचा तमाशा सुरु आहे. जनतेची कामे होणे अपेक्षीत होते, पण हे सरकार (Uddhav Thackeray) साडेसातशे दिवस पुत्र-पुत्री आणि पुतण्याभोवती फिरत आहे. सत्ता संपत्ती मिळविण्यासाठी सरकारकडून अमानवी अमानुष प्रयत्न केला गेला. तिन्ही पक्षांचा सत्ता भोवतीचा लोभ दोन वर्षे राहिला आहे. ठाकरे सरकार जनता केंद्रित होण्यापेक्षा पुत्र, पुत्री, पुतण्या भोवती केंद्रित राहिले,''

''या सरकारनं सामान्य माणसाचे भले केले नाही. अहंकार, अतर्क,असंवेदनशील कार्यपद्धती अशी सरकारची दोन वर्षे राहिली. पेट्रोल दर कमी झाली नाही पण विदेशी दारू कमी किंमत झाली. एस टी कर्मचाऱ्यांना देण्यासाठी या सरकारकडे पैसे नाहीत, शाळांचे अनुदान दिले जात नाही, पण रयत शिक्षण संस्थेला कोट्यवधी रुपये दिले जातात,'' असा आरोप शेलार यांनी यावेळी केला.

Ashish shelar, uddhav thackeray
मोठी बातमी : चिदंबरम पिता-पुत्राला न्यायालयाकडून समन्स

पार्टी, पब आणि पेंग्विन इतकंच सरकार

''आपला पुत्र राजकारणात स्थिरावला पाहिजे, यात चूक नाही, पण राज्यात निर्णय काय घेतले हे पहिले तर महाराष्ट्राची बदनामी झाली. पार्टी, पब आणि पेंग्विन इतकंच सरकार राहिले.

सरकारी कार्यालयाची वेळ वाढवली जात नाही, पण हॉटेलची वेळ वाढवली गेली. 'सुपुत्री'चा आग्रह इतकं होतो की राज्याच्या गृहमंत्रीपदी अनिल देशमुख यांना बसवावे लागले. असंख्य वेदना महाराष्ट्रातील जनतेला दोन वर्षे भोगावे लागत आहेत,'' असा आरोप शेलारांनी केला. ''पुतण्या प्रेमामुळे एक हजार कोटीच्यावर बेनामी संपत्ती आली,'' अशी टीका त्यांनी केली.

आरक्षण सरकारला टिकवता आलं नाही

''सोळा हजार ग्रामपंचायत प्रशासक म्हणून स्वतः ची लोक बसवण्याचा डाव सरकारचा होता, पण हा डाव न्यायालयाने फेटाळला. ''कोरोना काळात स्थलांतरीत कामगारांची काय सोय केली,'' असे म्हणत न्यायालयानं सरकारला फटकारलं. मी मंत्रालयात येणार नाही, मी अधिवेशन घेणार नाही, माझ्यापक्षा विषयी बोललात तर मुंडण करू,केंद्रीय मंत्री असलात तरी मुसक्या बांधून अटक करेल, असे म्हणणारे हे अहंकारी सरकार आहे. मराठा समाजाचे आरक्षण सरकारला न्यायालयात टिकवता आले नाही. ओबीसी राजकीय अरक्षण सरकारला न्यायालयात टिकवता आले नाही. दलित समाज, अनुसूचित योजना लोकांपर्यत पोहचत नाही, उद्योजक व्यापाऱ्यांना या राज्यात संरक्षण नाही,'' अशी टीका शेलारांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com