
मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांनी उमेदवारीचा अर्ज भरला आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल यांनी लटकेंच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरला आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये सामना रंगणार आहे.
"ठाकरेंनी पक्षाचं नाव बदलून रडकी सेना ठेवावं," अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार (ashish shelar) यांनी केली आहे. (ashish shelar news update)
पटेल यांनी भाजप नेते आशिष शेलार, प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत अर्ज भरला. यावेळी शेलार यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला.
शेलार म्हणाले, "मुरजी पटेलांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्थानिकांचा महापूर आला आहे. आमच्यासमोर १० पक्षांना सोबत घेऊन १० तोंडाचा रावण उभा आहे. ते उपरे बाहेरून लोकं बोलवतात. अनिल परब यांच्यासह बाहेरचे लोक आणि मुरजी पटेल असा स्थानिक संघर्ष आहे. परंतु या निवडणुकीत भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना-आरपीआय गटाच्या उमेदवाराचा २५-३० हजार मताधिक्यांनी विजय होईल,"
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते दीपक केसरकर म्हणाले, "सहानुभूतीच्या जोरावर ही निवडणूक लढवली जात आहे. अंधेरी पूर्व मतदार संघात नागरिक मुरजी पटेलांना भेटत आहेत. ऋतुजा लटकेंचा राजीनामा न स्वीकारण्यामागे ठाकरे गटाचं षडयंत्र होतं,"
मुरजी पटेल यांचा अर्ज भरताना भाजपचे नेते आशिष शेलार, प्रविण दरेकर, शिंदे गटाचे दीपक केसरकर उपस्थित होते. तर लटके यांनी अनिल परब, आदित्य ठाकरे, कॉंग्रेसचे नेते भाई जगताप यांच्या उपस्थिती आपला उमेदवारी अर्ज भरला.
मुरजी पटले यांनी 2019 मध्ये भाजपविरोधात बंडखोरी केली आणि अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मुरजी पटेलांकडे 2019 मध्ये 4.92 कोटींची संपत्ती आहे,तर ऋतुजा लटकेंकडे 50 लाख रुपयांची मालमत्ता असून त्यांच्यावर 18 लाखांचे कर्ज असल्याची माहिती त्यांच्या उमेदवारी अर्जावरुन समोर आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.