Mumbai News : मुंबई महापालिकेच्या कामात नको तेवढा हस्तक्षेप वाढवून भाजप मुंबईला लुटण्याचा डाव मांडत आहे. महापालिकेतील ती दालन आता बिल्डर्स, कंत्राटदारांचं आणि भाजपच्या माजी नगरसेवकांची ते कार्यालये झाली आहेत, मुंबईला लुटण्यासाठी जी यंत्रणा राबवली जात आहे. त्यात हे दालन हे सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणून मुंबईकर आंदोलन करणारच आणि ते कुठेही आणि कसं व्यक्त होईल, हे तुम्ही पाहा, असा शब्दात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.
मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुंबई महापालिकेत सुरु करण्यात आलेल्या दालनावरून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. " मिठी नदीच्या गाळ उपशासाठी चौकशी समिती नेमली. पण मुंबईला बदनाम करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत. मणिपूरमधूनही जसे व्हिडिओ येत आहेत, महिलांवर अत्याचाराच्या घटनांचे व्हिडिओ समोर येत आहेत. त्यासाठी एखादी चौकशी समिती नेमली नाही, त्यावर कोणी काही वक्तव्य केलं नाही. परवा एका महिलेची भर रस्त्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली, अशा अनेक घटना समोर येत आहेत, त्यासाठी कोणी चौकशी समिती नेमली नाही. आपण देशात राहतोय जिथे सत्तेबरोबर बोलणंही चुकीचं मानलं जातयं याचं दु:ख होत आहे."
मणिपूर बाबत चर्चा करण्याची मागणी केली म्हणून आम आदमी पक्षाचे खासदार, संजय सिंह यांना निलंबित करण्यात आलं. वातावरण खराब करण्याचं काम सुरू आहे. मणिपूरमध्ये हुकूमशाही, महाराष्ट्रात हुकूमशाही सुरू आहेत. पण इथे आम्ही 'इंडिया' म्हणून लढत आहोत. संसदेत, विधान भवनात आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
एक मंत्री यांच फुलावरुन नावा आहे पण ते काट्यासारखे वागत आहेत. परवा काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी विधीमंडळात प्रश्न विचारले पण ते त्यांच्यावरही भडकले. त्यांनी प्रश्नाचं उत्तर देणं हे त्यांचं कर्तव्य आहे, पण मंत्री महोदयांचा आवाज कच्चा होता म्हणून त्यांनी आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या नेत्या देवयांनी फरांदे यांनीही प्रश्न विचारले पण त्यांच्यावरही हे मंत्री भडकले, पण मंत्री महोदयांचा अभ्यासच कच्चा आहे. म्हणून त्यांनी आमदारांचा आवाज बंदच करण्याचा प्रयत्न केला. असा टोलाही आदित्य ठाकरेंनी यावेळी लगावला.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.