Chandrashekhar Bawankule News : राज्यात झालेल्या पहाटेच्या शपथविधीमागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची खेळी असू शकते, असे विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतेच केले आहे. त्यांच्या विधानावरुन सध्या राज्याचे राजकारण पेटलं आहे. जयंत पाटील यांनी केलेल्या विधानाबाबत नंतर स्पष्टीकरणंही दिले होते. पण हा विषय अजून संपलेला दिसत नाही.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (शुक्रवारी) जयंत पाटलांच्या या विधानाचा समाचार घेतला. ते माध्यमांशी बोलत होते. दोन दिवसापूर्वी जयंत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीविषयी विधान केलं होते. त्यानंतर यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. "भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी असू शकते," असे जयंत पाटील म्हणाले होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "जयंत पाटील जर खरं बोलत असतील तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे, शरद पवारांनी यापुढे असे राजकारण करु नये. शरद पवारांना हे शोभत नाही. जयंत पाटील यांचे म्हणणं खोटे असेल तर ते शरद पवार यांना बदनाम करीत आहेत,"
"पहाटेच्या शपथविधीच्या वेळी शरद पवारांनी अजित पवारांना बळीचा बकरा केला होता," असे जयंत पाटलांना म्हणायचे आहे का, जयंत पाटील खरे बोलले असतील तर हा जनतेचा अपमान आहे. पवारांना फडणवीसांना मुख्यमंत्री होऊ द्यायचे नव्हते," असे बावनकुळे म्हणाले.
पहाटेच्या शपथविधीवर काय म्हणाले होते जयंत पाटील...
"अजित पवार भुलले असतील असं मला वाटत नाही. त्यावेळी राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी दुसरा काही पर्याय नव्हता. ती उठवण्यासाठी शरद पवारांनी केलेली ही खेळी असू शकते. त्यामुळे अजित पवारांनी त्यावेळी जी विधानं केली आज महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकारमध्ये त्यांनी काम केलं. राष्ट्रवादी फुटली नाही, तर शिवसेनेचे आमदार गेल्याने सरकार कोसळलं. राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत साथ दिली हे नाकारता येणार नाही"
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.