Jitendra Awhad News : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना 'ते' वादग्रस्त विधान भोवणार; भाजपकडून तक्रार दाखल

The Kerala Story Cinema Dispute : दोन समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्याचा भाजपचा आव्हाडांवर आरोप
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

Thane : 'द केरला स्टोरी' या चित्रपटावरुन सध्या राजकारण तापलं आहे. काही राज्यात हा चित्रपट टॅक्स फ्री केला आहे तर काही राज्यात या चित्रपटाच्या शोवर बंदी घातली आहे. या चित्रपटावरुन महाराष्ट्रातील राजकारण देखील चांगलंच ढवळून निघालं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात या चित्रपटावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. याचदरम्यान, आव्हाड यांनी या चित्रपटासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे भाजप आक्रमक झाली असून त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी 'द केरला स्टोरी' या चित्रपटाच्या निर्मात्याला सार्वजनिक ठिकाणी फाशी द्या असं वादग्रस्त विधान केलं होतं. या विधानामुळे आव्हाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या वक्तव्याविरोधात भाजप पदाधिकाऱ्याच्या वतीनं वर्तकनगर पोलीस ठाण्यात आव्हाडांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आव्हाड यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्याचा आरोप भाजपनं केला आहे.

Jitendra Awhad
Subramanian Swamy on Mamata Banerjee: मोदी नव्हे, ममता बॅनर्जींनी पंतप्रधान व्हायला पाहिजे, भाजपच्या बड्या नेत्याचं विधान..

द केरला स्टोरी(The Kerala Story) चित्रपटावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. भाजप या चित्रपटाच्या समर्थनार्थ उतरली आहे असून नेतेमंडळींकडून विविध ठिकाणी या चित्रपटाच्या मोफत शोचं आयोजन देखील करण्यात येत आहे. तर विरोधी पक्षांकडून या चित्रपटावर टीकेची झोड उठवली जात आहे. यातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या वादात उडी घेत 'द केरला स्टोरी' या चित्रपटावरुन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच या चित्रपटामुळे महाराष्ट्र शाहीर या मराठी चित्रपटांवर अन्याय होत असल्याची टीका देखील केली आहे.

Jitendra Awhad
Devendra Fadnavis News: फडणवीसांच्या अडचणी वाढणार? २०१४ च्या निवडणुकीसंदर्भात 'ही' धक्कादायक बाब समोर

काय आहे आव्हाड यांचं वादग्रस्त वक्तव्य?

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या 'द केरला स्टोरी' चित्रपटाच्या निर्मात्याला सार्वजनिक ठिकाणी फाशी देण्यात यावी असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या चित्रपटामुळे केरळची प्रतिमा डागळली गेली असून महिलांचा अपमान झाल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.

तसेच या चित्रपटात केरळमधून 32 हजार महिला बेपत्ता आहेत आणि त्यांनी इसीस जॉईन केलं आहे असल्याचा दावा केल्याचं म्हटलं आहे. पण खरा आकडा केवळ तीन असल्याचंही आव्हाड यांनी म्हणाले आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com