भाजपनं 'टोमणा बॉम्ब' टाकत मुख्यमंत्री ठाकरेंना केलं घायाळ!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या शाब्दिक कोट्या करत केंद्रीय तपास यंत्रणांसह विरोधी पक्ष असलेल्या भाजपवरही जोरदार निशाणा साधला होता.
BJP Tweet on CM Uddhav Thackeray
BJP Tweet on CM Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या नेहमीच्या शाब्दिक कोट्या करत केंद्रीय तपास यंत्रणांसह विरोधी पक्ष असलेल्या भाजपवरही (BJP) जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर त्यांचेकडे एकच अस्त्र आहे ते म्हणजे टोमणा बॉम्ब, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले होते. आता पुन्हा एकदा भाजपनं हाच बॉम्ब टाकत मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली आहे.

महाराष्ट्र भाजपकडून रशिया युक्रेन युध्दाचा (Russia Ukraine War) संदर्भ देत याबाबतच ट्विट करण्यात आलं आहे. 'टोमणा बॉम्ब' एक्सपर्टनी अखेर युक्रेनच्या मदतीसाठी टोमणा बॉम्ब सह इतर बॉम्ब ही बाहेर काढले. आयुष्य गेलं हे सर्व बॉम्ब तयार करण्यात, असं ट्विटमध्ये म्हणत भाजपनं अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. तसेच त्यासोबत एक व्यंगचित्रही असून विविध प्रकारेच बॉम्ब, घाबरलेल्या स्थितीतील चीन आणि रशिया तर आनंदी झालेले अमेरिका, ब्रिटन आणि युक्रेनचे राष्ट्रप्रमुख दाखवले आहेत.

BJP Tweet on CM Uddhav Thackeray
तीन दिवसांत महाविकास आघाडीच्या चार नेत्यांचा 'निकाल' लागणार

व्यंगचित्रात मध्यभागी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हातात टोमणे बॉम्ब असे लिहिलेले एक क्षेपणास्त्र दाखवले आहे. तर खाली पायाशेजारी भिकार पी. जे. बॉम्ब, मावळे-कावळे बॉम्ब, मर्द-छाताड बॉम्ब असं लिहिलेली क्षेपणास्त्रांची चित्र दाखवली आहेत. 'रशियाने ताबडतोब युध्द थांबवावं, नाहीतर मी माझ्याकडे असलेल्या बॉम्बपैकी सर्वात शक्तिशाली टोमणे बॉम्ब युक्रेनला देईल,' असं मुख्यमंत्री म्हणत असल्याचे व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे. या व्यंगचित्रातून भाजपनं ठाकरे यांना टोमणा मारला आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?

संस्थांचा दुरुपयोग करून दहशत निर्माण करण्याचं काम सुरु आहे. लढण्याची ताकद नाही म्हणून शिखंडीला पुढं आणून जसं महाभारतात युद्ध लढलं गेलं तसं युद्ध आता सुरु आहे. घराघरातलया कुटुंबियांना बदनाम करायचे, धाडी टाकायचं काम सुरु आहे. सत्ता पाहिजे आहे ना, पेन ड्राईव्ह गोळा करू नका, मी तुमच्यासोबत येतो, सत्तेसाठी नाही, तुम्ही जे चाळे केले, माझ्या कुटुंबियांना बदनाम करत आहात, मालमततेवर टाच.. मी टाचेला घाबरत नाही. या मला तुरुंगात टाका. मी कधीही तुमच्या कुटुंबियाना त्रास दिला नाही. एवढाच जीव जळत असेल तर मला तुरुंगात टाका, मी भावनिक बोलतो, हो बोलतो. मला तुरुंगात टाकलं तरी मी सगळ्यांच्यावतीने ती जबाबदारी घेतो. ज्यांनी मुंबई वाचवली त्या शिवसैनिकांना छळू नका. हा तुरुंगात जाणार, तो तुरुंगात जाणार असं जे म्हणतात ते केंद्रीय संस्थांचे दलाल आहेत का, असं मुख्यमंत्री म्हणाले होते.

फडणवीस यांनी काय उत्तर दिले?

उद्धव ठाकरे यांचे हे भाषण म्हणजे अरण्यरुदन असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ईडीला घरगडी म्हणता. आम्ही मुंबई पोलिसांना तुमचे गडी आहेत, असे कधी म्हणतो का? घरच्या गड्यांवर ईडीने कारवाई केल्याने राग आला आहे का, असा सवाल त्यांनी केला. मी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांकडे उत्तर नव्हते. त्यांचेकड एकच अस्त्र आहे ते म्हणजे टोमणाबाॅम्ब, अशा शब्दांत फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. आज हे अटक होणार, उद्या ते अटक होणार, असे म्हणणारे जर त्या संस्थांचे दलाल असतील तर हेच संजय राऊतांनी सांगा जरा. बाप-बेेटे तुरुंगात जाणार, हे राऊत कसे काय सांगतात, असेही उदाहरण फडणवीस यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com