
मुंबई : ''पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच नाही, कॉग्रेसनेच देशाची माफी मागितली पाहिजे, कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)हे नैांटकीबाज आहेत,'' अशा शब्दात विरोधी पक्षनेते काही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पटोलेंना फटकारले. फडणवीस यांच्या बंगल्यासमोर कॉग्रेसने आंदोलन सुरु केले होते. काही तासानंतर पटोलेंनी हे आंदोलन मागे घेतले. त्यानंतर फडणवीसांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेचा अपमान केला असून त्यांनी माफी मागेपर्यंत भाजपा नेते, आमदार, खासदारांच्या घरापुढे, भाजप कार्यालयांपुढे आंदोलन करण्याची घोषणा नाना पटोले यांनी केली होती.
पटोलेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यासमोर आंदोलनाची हाक दिली होती. पटोले आंदोलन करण्यासाठी जात असतानाच त्यांना रस्त्यातच पोलिसांनी अडवले. सुरक्षतेच्या कारणामुळे पटोलेंना अडवले असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले.
सोमवारी सकाळी आंदोलन करण्याची तयारी काँग्रेसकडून करण्यात आली होती. यानंतर भाजपानेही हिंमत असेल तर येऊन दाखवा, जशास तसे उत्तर दिले जाईल, असं आव्हान भाजप नेते प्रसाद लाड यांनी दिलं होतं.
भाजपा कार्यालयांपुढे निदर्शने झाल्यावर फडणवीस यांच्या निवासस्थानापुढे आंदोलन केलं जाणार होतं. दरम्यान या आंदोलानमुळे भाजपा कार्यकर्तेही आक्रमक झाले होते. पोलिसांनी त्यांना काही ठिकाणी त्यांना ताब्यात घेतलं आहे. कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पटोलंनी रस्त्यातच सुरु केलेल्या आंदोलनात वारकऱ्यांनीही सहभाग घेतला होता.
सकाळपासून 'सागर' बंगला परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मलबार परिसरात सुरु असलेल्या या आंदोलनात भाजप-कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु होती. अतुल लोंढे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भाजपचे नेते गोपाळ शेट्टींना यांनाही पोलिसांनी अडविले होते. आंदोलनामुळे मलबार हिल परिसरात वाहतुक कोंडी झाली होती. रस्त्यावर आंदोलन सुरु असताना फडणवीसाच्या बंगल्यावर भाजपचे नेते आशिष शेलार, गोपाळ शेट्टी, प्रसाद लाड उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.