BJP Mission 48: भाजपचे 'मिशन 48' : लोकसभा निवडणूकप्रमुखांची घोषणा; मोहोळांवर पुण्याची तर लांडगेंवर... पाहा संपूर्ण यादी

Chandrashekhar Bawankule News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे.
Murlidhar Mohol, Mahesh Landge News
Murlidhar Mohol, Mahesh Landge NewsSarkarnama
Published on
Updated on

Murlidhar Mohol News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील निवडणूकप्रमुखांची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली. पुणे लोकसभेची जबाबदारी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर देण्यात आली आहे.

पुणे (Pune) लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून मोहोळ यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, त्यांच्याकडेच निवडणूक प्रमुखाची जबाबदारी दिल्यामुळे आता त्यांना उमेदवारी मिळणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. तसेच बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघात आमदार राहुल कुल यांच्यावर जबबादारी देण्यात आली आहे. तर शिरुर लोकसभा मतदारसंघामध्ये महेश लांडगे यांना जबादारी देण्यात आली आहे.

Murlidhar Mohol, Mahesh Landge News
Shahu Maharaj On Kolhapur Riot : कोल्हापुरातील राड्याप्रकरणी छत्रपती शाहू महाराज म्हणाले; पोलिसांनी...

मावळमध्ये प्रशांत ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिक, हातकणंगले सत्यजीत देशमुख, सांगली दिपक शिंदे, सातारा अतुल भोसले, सोलापूर प्रशांत परिचारक यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. या नियुक्त्यांच्या माध्यमातून भाजपने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

Murlidhar Mohol, Mahesh Landge News
Akola District News : अकोला लोकसभा निवडणूक प्रमुखाची जबाबदारी ‘या’ खासदार पुत्रावर !

दरम्यान, अकोला लोकसभा निवडणूक प्रमुखाची जबाबदारी खासदार पुत्र अनुप धोत्रे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राजकीय जीवनात प्रथमच महत्त्वाच्या पदावर अनुप यांना नियुक्ती मिळाली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघ २००४ पासून सातत्याने भाजपकडे राहिला आहे. संजय धोत्रे हे १४ व्या लोकसभेत सन २००४ मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर १५, १६ आणि १७ व्या लोकसभेतही त्यांनी अकोला लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. गेले दोन वर्षांपासून हे गंभीर आजाराने ग्रासले असल्याने सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. भाजपने आता त्यांच्या मुलावर महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com