BJP Thane Office : एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपने उभारली सुसज्ज कार्यालयाची गुढी!

Thane Political News : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार उद्घाटन!
BJP Thane Office
BJP Thane OfficeSarkarnama

Thane BJP Office News : ठाणे महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवा अशी पक्षातील जेष्ठ नेत्यांची खूप वर्षापासूनची इच्छा आहे. त्याच दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच प्रथम भाजपने सुसज्ज कार्यालय उभारून एक पाऊल पुढे टाकल्याचे दिसत आहे. अशाप्रकारे देशभरात भाजपच्या प्रत्येक प्रदेश कमिटीने मोठ्या शहरांमध्ये आपले प्रशस्त विभागीय कार्यालय उभारण्यास सुरू केली आहे.

हे कार्यालय 13 हजार स्क्वेअर फुटाचे असून, यामध्ये एकावेळी किमान तीनशे कार्यकर्ते बसू शकतील अशी आसन व्यवस्था आहे. त्याचबरोबर बाहेरून येणाऱ्या नेत्यांची राहण्याची व्यवस्थाही इतर सोयीसुविधासह असणार आहे. या भव्य कार्यालयाचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या हस्ते होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

BJP Thane Office
BJP-MNS Alliance: गुढीपाडवा मेळाव्याआधीच फडणवीसांनी मनसेबाबत टाकला मोठा बॉम्ब; म्हणाले, 'महायुतीत मनसे...'

सध्या ठाणे शहरात भाजपाचे(BJP) खोपट परिसरात पक्ष कार्यालय आहे. पण ही जागा कार्यकर्त्यांचा ओघ पाहता अपुरी पडते. परिणामी ठाणे शहरात मध्यवर्ती ठिकाणी पक्षाचे मोठे सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असे कार्यालय उभारण्याच्या दुष्टीने भाजपा प्रयत्नशील होती. त्याचाच एक भाग म्हणून वर्तकनगर परिसरातील समता नगर येथे एका कंपनीच्या आवारात भाजपाच्या प्रदेश नेतृत्वाकडून एक जागा निश्चित करण्यात आली होती. याठिकाणी 13 हजार स्क्वेअर फुटाचे भले मोठे कार्यालय उभारण्यात आले आहे. भाजपाच्या नवीन पक्ष कार्यालयाचा लूक हा हायटेक असा आहे.

या कार्यालयात निवडणुकीची प्रचारयंत्रणा राबविण्याच्या दुष्टीने सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. या येथे एकावेळी किमान तीनशे कार्यकर्ते बसू शकतील इतकी आसन क्षमता करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यातील इतर भागातून विविध कामासाठी ठाण्यात येणारे पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांची राहण्याची व्यवस्थाही येथे होणार आहे. महत्वाचे म्हणजे ठाणे शहर हे आता राजकीय दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानले जाते. या कार्यालयाचे कामकाज पाहण्यासाठी एका भवन समितीची निर्मितीही करण्यात आली होती.अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

BJP Thane Office
Sanjay Nirupam News : संजय निरुपमांच्या शिंदे गटात प्रवेशाला उशीर का? खरे कारण आले समोर...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com