Sanjay Nirupam News : संजय निरुपमांच्या शिंदे गटात प्रवेशाला उशीर का? खरे कारण आले समोर...

Mumbai North East Loksabha : अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय निरुपम यांनी त्यांच्यावर जाहीर टीका केला होती. खिचडी घोटाळ्यात सहभागी असणाऱ्याचा प्रचार करणार नाही, असे वक्तव्य निरुपम यांनी केले होते. कीर्तिकर यांच्यावर टीका करण्यासोबतच निरुपम यांनी काँग्रेसलादेखील घरचा आहेर दिला होता.
Eknath Shibde Sanjay Nirupam
Eknath Shibde Sanjay Nirupam sarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : काँग्रेस पक्षाने हाकलपट्टी करण्याआधीच संजय निरुपमांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. निरुपम भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा सुरू असताना भाजपमधील मोहीत कंबोज यांनी निरुपमांच्या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध केला. त्यानंतर संजय निरुपम हे एकनाथ शिंदेंच्या Eknath Shinde शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, महायुतीमध्ये उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघ कोणाकडे जाणार हे स्पष्ट न झाल्याने संजय निरुपम शिंदे गटात पक्षप्रवेश करत नसल्याची सूत्रांची माहिती आहे.

Eknath Shibde Sanjay Nirupam
ShivsenaUBT VS Congress : मुंबईतील जागेवरून ठाकरे गट-काँग्रेसमध्ये वाद होणार? उमेदवार लागला कामाला...

महायुतीत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ ज्या पक्षाकडे त्या पक्षात प्रवेश करणार असल्याची भूमिका संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळेच त्यांचा अजून शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश झालेला नाही. निरुपम ज्या पक्षात प्रवेश करतील, त्या पक्षाला उत्तर भारतीयांची मते मिळवणे सोपे जाणार आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेला आहे. अमोल कीर्तिकर हे येथून ठाकरे गटाचे उमेदवार असणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय निरुपम यांनी त्यांच्यावर जाहीर टीका केला होती. खिचडी घोटाळ्यात सहभागी असणाऱ्याचा प्रचार करणार नाही, असे वक्तव्य निरुपम यांनी केले होते. कीर्तिकर यांच्यावर टीका करण्यासोबतच निरुपम यांनी काँग्रेसलादेखील घरचा आहेर दिला होता. काँग्रेसमध्ये पाच शक्तिकेंद्र तयार झाली असून, नेत्यांकडून कार्यकर्त्यांना वेळ दिला जात नसल्याची टीका निरुपम यांनी केली होती.

अभिनेता गोविंदा याने नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. गोविंद उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे निरुपम यांनी शिंदे गटात प्रवेश केला तरी त्यांना कोणते पद देणार याचा प्रश्न अजून कायम आहे. त्यामुळे जो पर्यंत उत्तर पश्चिम मतदारसंघ कोणाकडे याचा फैसाल होत नाही तोपर्यंत संजय निरुपम यांनी वेट अँड वाॅचची भूमिका घेतली आहे.

R

Eknath Shibde Sanjay Nirupam
Jitendra Awhad News : 'भ्रष्टाचाराला अधिकृत मान्यता देत भाजपचा भ्रष्टाचार' जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर घणाघात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com