मुंबई : ग्रामपंचायतीच्या निवडणूकांमध्ये (Gram Panchayat election ) भारतीय जनता पक्षच पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरल्याचे हाती आलेल्या निकालावरून दिसून येत आहे. तर दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने आपले स्थान राखले आहे. काँग्रेसने आश्चर्यकारपणे या निवडणुकीत तिसरा क्रमांक राखले. तर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये काट्याची लढत पाहायला मिळाली. मंत्र्यासह, आमदारांना आव्हान मिळाले आहे तर अनेक ठिकाणी धक्का देणारे निकाल लागले.
ग्रामपंचायत निवडणुकीचा एकूण निकालाकडे पाहता महाविकास आघाडीने भाजप आणि शिंदे गटाला मागे पाडले आहे. एकूणच महाविकास आघाडीची भाजप-शिंदे गटावर सरशी झाल्याचे दिसून येत आहे. एकूण 608 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक पार पडली. यापैकी 57 ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली.
मविआने 258 ग्रामपंचायतीवर विजय मिळवला, तर भाजप-शिंदे गटाने 228 ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकवला. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात भाजप आणि राष्ट्रवादीत फारसे अंतर नव्हते. भाजपने 188 ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व मिळवला तर राष्ट्रवादीने दुसरा क्रमांक राखत 136 ग्रामपंचायतींवर विजय साकारला.
शिवसेनेतल्या फूटीनंतर ही पहिलीच निवडणूक होती. फूटीचा परिणाम या निवडणूक निकालात स्पष्ट जाणवतो. ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेला या निवडणूकीत फक्त 37 ग्रामपंचायतींवर समाधान मानावे लागले असून शिवसेना पाचव्या स्थानावर आहे. तर याऊलट 40 ग्रामपंचायतींवर विजय मिळवत शिंदे गटाने चौथं स्थान मिळवत शिवसेनेवर मात केली आहे.
दिग्गज - मातब्बर नेत्यांच्या वर्चस्वाला धक्का -
१) अहमदनगर जिल्ह्यात राजूर ग्रामपंचायत निवडणुकीत आश्चर्यकारक निकाल लागले आहे. पिचड पिता-पुत्रांच्या वर्चस्वाला धक्का बसलाय. अत्यंत रोमांचक झालेल्या लढतीत सरपंचपदी स्ठानिक राजूर विकास आघाडीच्या पुष्पाताई निगळे या विजयी झाल्या आहेत. केवळ 19 इतक्या मताधिक्याने सरपंचपदी विकास आघाडीचा विजय झाला. मधुकर पिचड यांच्या मूळ गावातच त्यांना पराभव स्विकारावा लागला.
२) नंदूरबारच्या दुधाळे ग्रामपंचायत निवडणुकीत विद्यमान मंत्री विजयकुमार गावितांना यांनाही धक्का बसला आहे. गावित यांची पुतणी प्रतिक्षा जयेंद्र वळवी यांचा पराभव झाला. शिंदे गटाच्या उमेदवार अश्विनी प्रकाश मालचे यांच्याकडून त्यांना पराभव स्विकारावा लागला.
३) बुलढाणा जिल्ह्यात आमदार संजय कुटे यांचं वर्चस्व मोडून निघाले आहे. सायखेड ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने विजयश्री खेचून आणला आहे.
४) पुणे जिल्ह्यातील 61 पैकी जवळपास 30 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने स्वबळावर सत्ता मिळवत, पुणे काबीज केले आहे. दिलीप वळसे पाटील आणि अतुल बेनके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीला शिंदे गट आणि भाजपचा वारू रोखण्यात यश आले आहे.
५) सातारा जिल्हा खेड ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या पॅनलचा विजय झालाय. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आमदार शशिकांत शिंदे यांच्या पॅनलला पराभव स्विकारावा लागला.
६) परभणी जिल्ह्यातील कौसळी ग्रामपंचायतीत काँग्रेसने भाजप आणि राष्ट्रवादीला अस्मान दाखवले आहे. काँग्रेसचे उमेदवार मोबीन कुरेशी हे सरपंचपदी निवडून आले आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.