Kapil Patil News : भाजपला गाडण्याची ताकद कोणामध्येही नाही; कपिल पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला

Maharashtra Politics : आमचा नेता ठरलेला आहे. हे सर्व एकत्र आले तरी यांना यांचा नेता ठरवता आलेला नाही.
Kapil Patil, Uddhav Thackeray
Kapil Patil, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Dombivali : पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ममता बॅनर्जी यांना आयएनडीआयए बैठकीत बसायला खुर्ची मिळाली नाही आणि त्या रागात निघून गेल्या. अशी परिस्थिती आयएनडीआयएची आहे. त्यांनी मोदींना काढण्याची स्वप्न पाहू नये, असा टोला केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याण येथील कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

पत्रकारांशी बोलताना मंत्री पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावताना इंडियाचा उल्लेख आयएनडीआयए असा केला."तुम्हाला गाडण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत," असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला होता. यावर बोलताना कपिल पाटील यांनी ठाकरेंना टोला लगावला. मोदीजींना काढण्याची स्वप्न बघू नये, मोदींना देशातल्या जनतेने स्वीकारलेल्या आहे, त्या जनतेचा त्यांना आशीर्वाद आहे त्यांचं 2024 मध्ये कोणीही काही करू शकणार नाही आणि भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा जास्त संख्येने जिंकून येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Kapil Patil, Uddhav Thackeray
Maratha Kranti Morcha : सदाभाऊंचा डीएनए चेक करण्याची वेळ आली; खोतांवर मराठा ठोक क्रांती मोर्चा आक्रमक

आमचा नेता ठरलेला आहे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातीलच नाही तर जगातील जनतेने स्वीकारले आहे. देशात पुन्हा एकदा मोदी यांचे सरकार बनेल तेही आत्तापेक्षा जास्त जागा जिंकून बनेल. अशा भाजपला गाडण्याची ताकद 3 काय 30 पक्ष एकत्र आले तरी कोणामध्ये नसेल. आमचा नेता ठरलेला आहे हे सर्व एकत्र आले तरी यांना यांचा नेता ठरवता आलेला नाही. मुंबईत परिषद झाली त्याचे संयोजक ठाकरे होते. भाजपला गाडण्याची ताकद कोणामध्येही नाही, असे कपिल पाटील म्हणाले.

काँग्रेसने हमासला समर्थन केलं...

गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूवर फुलांचा वर्षाव भाजपकडून केला जातो, तर मी समाजवाद्याशी का बोलू नये, असे उद्धव ठाकरे म्हणाले आणि त्याला उत्तर देत पाटील यांनी सांगितले की, समाजवाद्यांशी बोलायला त्यांना कोणी मनाई केली आहे. ते काय काय बोलतात याच्यावर मी भाष्य करायला एवढा सक्षम माणूस नाही. मी भाजपचा सामान्य कार्यकर्ता आहे. भारतीय संघाने जो विजय मिळवला तो विजय इतका महत्त्वाचा आणि दमदार आहे की इस्राईलचे जे राजदूत आहेत त्यांनी सांगितलं की, आता हमासला समर्पित करायला यांना संधी मिळाली नाही. म्हणजे हमासला समर्पित करणाऱ्या लोकांचा समर्थन करणारे त्यांच्या सोबतही आहेत, असं समजा काँग्रेसने हमासला समर्थन केलं ते त्यांच्यासोबत आहेत, असे पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com