''कसं काय शेलार बरं हाय का ? भाजप कार्यालयासमोरच पोस्टरबाजी

आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांना तमाशातील एका पात्राच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहे. त्या फलकाखाली आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारी टीकाही करण्यात आली आहे.
''कसं काय शेलार बरं हाय का ? भाजप कार्यालयासमोरच पोस्टरबाजी
Published on
Updated on

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल भाजप नेते आशिष शेलार यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन राजकारण पेटलं आहे. या वादामुळे शिवसेना-भाजप आमनेसामने आले आहेत. शेलारांच्या वक्तव्यावरून शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद ही सध्या सुरू आहे. त्यातच आता शिवसेनेनं आक्रमकपणे आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारं पोस्टर मुंबईत नरीमन पाँईट येथील भाजप प्रदेश कार्यालयासमोरच लावलं आहे.

यावर भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांना तमाशातील एका पात्राच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहे. त्या फलकाखाली आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारी टीकाही करण्यात आली आहे. हे फलक कोणी लावलं याची माहिती अद्याप समजलेली नाही. यावरुन भाजपचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. भाजप कार्यालयासमोरच थेट अशा प्रकारची पोस्टरबाजी करण्यात आल्याने याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

या पोस्टरवर आशिष शेलार यांच्या फोटोचे विडंबन करण्यात आले आहे. त्याशिवाय, एका गाण्याचे विडंबन करण्यात आले आहे. शेलार यांच्यावर शेलक्या भाषेत टीका करण्यात आली आहे. ''कसं काय शेलार बरं हाय का ? काल काय एैकलं ते खरं हाय का ? काल म्हणं तूम्ही, किशोरी ताईंचा अपमान केला, तमाशातल्या नाच्या सारखा शिमगा केला,'' अशा ओळी या बॅनरखाली लिहिण्यात आल्या आहेत.

दरम्यान, किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांना धमकीचे पत्र आले आहे. या पत्राव्दारे कुटुंब संपविण्याची धमकी देण्यात आली आहे. पेडणेकर महापैार झाल्यानंतर दुसऱ्यांदा आलेले हे धमकीचं पत्र आहे. हे पत्र कुणी पाठवले आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे पत्र मुंबईबाहेरुन आलं असल्याचं बोललं जात आहे. तसेच हे पत्र मराठीत असल्याचीही माहिती समोर आली आहे.

''कसं काय शेलार बरं हाय का ? भाजप कार्यालयासमोरच पोस्टरबाजी
ठाकरे सरकारला टक्केवारीतच रस ; बहुजन पोरांविषयी देणंघेणं नाही

या पत्रामध्ये पेडणेकर यांच्याबद्दल अश्लील भाषेचा वापर करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर यांना मिळालेलं हे धमकीचे पत्र पनवेल येथून कुरिअरद्वारे आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. पत्राच्या वर दुसरे नाव आहे आणि आतमध्ये वेगळे नाव असल्याचे सांगितले जात आहे. पेडणेकर यांना ज्या पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे, त्या पत्रावर जुन्या घराचा पत्ता असल्याचं सांगण्यात येत आहे. महापौरांना जी पत्रे येतात, त्यात हे देखील पत्र होतं. हे पत्र नेमकं कुठून आलं, ते कुणी पाठवलं याबाबत काही माहिती मिळू शकलेली नाही.

या पत्रात महापौरांच्या कुटुंबियांनाही गोळ्या घालुन मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ''माझ्या दादाकडे बघशील तर परिणाम वाईट होतील,'' अशी धमकी देत या पत्रात अश्लिल भाषा वापरण्यात आली आहे. हे पत्र महापौर निवासस्थानाच्या पत्त्यावर आले आहे. याबाबत पेडणेकर या पोलिसांकडे तक्रार दाखल करणार आहेत. कुटुंबीयांसाठी संरक्षण देण्याची मागणी त्या करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com