चंद्रकांतदादांचा पवारांना टोला; म्हणाले, जे केलं नाही त्यावर आता राष्ट्रवादी आंदोलन करणार

BJP|Chandrakant Patil|Sharad Pawar : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राज्य निवडणुक आयोगाचे आयुक्त यू.पी.एस. मदान यांची आज भेट घेतली.
Chandrakant Patil, Sharad Pawar Latest News
Chandrakant Patil, Sharad Pawar Latest Newssarkarnama
Published on
Updated on

Chandrakant Patil : ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) १७ जिल्ह्यांमधील तब्बल ९२ नगरपालिका आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्याने राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे टेंन्शन वाढले आहे. दरम्यान आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) राज्य निवडणुक आयोगाचे (Election Commission) आयुक्त यू.पी.एस. मदान यांची भेट घेत राज्यात पाऊस असल्याने जाहीर करण्यात आलेल्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्या, अशी मागणी केली.

दरम्यान राष्ट्रवादीकडून ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये, अशी भूमिका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली. यावर पाटलांनी खोचक शब्दात टीका केली. अडीच वर्ष सत्तेत असताना त्यांनी जे केलं नाही त्यावर आता त्यांना आंदोलन करण्याचा सल्ला राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला असावा, असा चिमटा त्यांनी पवारांना काढला. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. (Chandrakant Patil, Sharad Pawar Latest News)

Chandrakant Patil, Sharad Pawar Latest News
मलाही गुवाहाटीवरून फोन आला होता : गडाखांनी घेतला उद्धव ठाकरेंबरोबरच राहण्याचा निर्णय

पर्जन्यमान कमी असलेल्या १७ जिल्ह्यांमधील ९२ नगरपालिका व ४ नगरपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या निवडणुकीची प्रक्रिया २० जुलैपासून सुरु होणार असून १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ ऑगस्ट रोजी मतमोजणी करुन निकाल जाहीर केले जाणार आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे टेंन्शन वाढले आहे. यामुळे पाटील यांनी आज राज्य निवडणुक आयोगाच्या प्रमुखांची भेट घेत राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने जाहीर करण्यात आलेल्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्या, अशी मागणी केली यावर राज्य निवडणूक आयुक्तांनी शहरानुसार फेर आढावा घेण्याचे आश्वासन दिले.

Chandrakant Patil, Sharad Pawar Latest News
Hingoli : हजारो समर्थक घेऊन आमदार बांगर उद्या मुंबईत ; शक्तीप्रदर्शन करत शिंदे गटात

ते म्हणाले, सुप्रिम कोर्टाकडून निवडणूक आयोगास निवडणुका जाहीर करण्याचे अधिकार दिले आहे. त्यानुसार त्यांनी पर्जन्यमान कमी असलेल्या ९२ नगरपालिका व ४ नगरपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला. मात्र, गेल्या दोन वर्षात कोल्हापूर आणि कराड भागात ज्याप्रकारे पाऊस पडला तो बघता आयोगाने, असा निर्णय कसा काय घेतला, असा सवाल उपस्थित केला आहे. या निवडणुक प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा असे म्हटले जाते मात्र, पाऊस असल्याने मतदारांनी मतदानासाठी होडीने यायचे का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तर आम्हाला या निमित्ताने काही वेळ मिळाला तर ओबीसी आरक्षणासहीत निवडणुका घेता य़ेईल, असाही आपला उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

Chandrakant Patil, Sharad Pawar Latest News
शिंदे गटाचे आमदार आक्रमक होताच सोमय्या झाले मवाळ; ठाकरेंच्या प्रश्नावर केली राऊतांवर टीका

दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका घेऊ नये, अशी भूमिका व्यक्त केली आहे, असा प्रश्न माध्यम प्रतिनिधीने पाटलांना विचारला असाता पाटलांनी यावेळी एका व्यंगचित्राचा दाखला दिला आणि म्हणाले की, त्या चित्रात कदाचित अजित पवारच असावेत मात्र राष्ट्रवादीचा एक नेता पवारांना विचारत आहेत की आता पुढे काय करावे त्यावर पवार साहेब म्हणतात की जे-जे आपण केले नाही त्यासाठी आता आपण आंदोलन करायचं, अशी खोचक टीका पाटलांनी पवारांवर केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com