Hingoli : हजारो समर्थक घेऊन आमदार बांगर उद्या मुंबईत ; शक्तीप्रदर्शन करत शिंदे गटात

एकनाथ शिंदे साहेबांच्या निवासस्थानाबाहेर आम्ही या सगळ्या समर्थकांचा शिंदे गटात समावेश करून घेणार आहोत. (Mla Santosh Bangar)
Mla Santosh Bangar, Hingoli News
Mla Santosh Bangar, Hingoli NewsSarkarnama
Published on
Updated on

हिंगोली : ऐन विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी बंडखोरी करत कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी शिंदे गटाला मतदान केले होते. बांगर (Santosh Bangar) यांच्या या अचानक घेतलेल्या निर्णायामुळे शिवसेनैला धक्का बसला होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Marathwada) यांनी आता बंडखोरांच्या विरोधात आक्रमक पावित्रा घेत त्यांच्याकडे असलेली पद काढून घेण्याचा धडाका लावला आहे.

आमदार बांगर हे हिंगोलीचे जिल्हाप्रमुख म्हणून देखील कार्यरत होते. ते आता शिंदे गटासोबत गेल्यामुळे ठाकरे यांनी त्यांची जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी केली. (Hingoli) या कारवाईनंतरही बांगर मात्र मीच बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा जिल्हापमुख असल्याचा दावा करत मला या पदावरून कोणीही हटवू शकत नाही, असे आव्हान ठाकरेंना दिले होते.

एवढ्यावरच न थांबता आता बांगर आपल्या हजारो समर्थकांसह उद्या मुंबईत दाखल होणार आहेत. समर्थकांना घेऊन शक्तीप्रदर्शन करत हे सगळे लोक शिंदे गटात सामील होणार आहेत. बांगर यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना ही माहिती दिली.

बांगर म्हणाले, मला जिल्हाप्रमुख पदावरू हटवल्यानंतर समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तुम्हीच जिल्हाप्रमुख आहात, असे सांगत हिंमत दिली. तरीही समर्थकांचा संताप काहीकेल्या कमी होत नाहीये. त्यामुळे उद्या, जिल्ह्यातील एक हजारावर समर्थकांसह मी मुंबईला जाणार आहे.

Mla Santosh Bangar, Hingoli News
Sharad Pawar : यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक कायम माझ्या अंत:करणात..

तिथे एकनाथ शिंदे साहेबांच्या निवासस्थानाबाहेर आम्ही या सगळ्या समर्थकांचा शिंदे गटात समावेश करून घेणार आहोत. मुंबईला जाण्यासाठी खाजगी वाहनांची व्यवस्था केली असून मोठ्या संख्येने समर्थक शिवसैनिक मुंबईला येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com