गुलाबराव पाटील हा तर...! चित्रा वाघ भडकल्या

पाटील यांनी प्रचारसभेदरम्यान हेमा मालिनी यांच्याविषयी वक्तव्य केलं होतं.
Chitra Wagh, Gulabrao Patil

Chitra Wagh, Gulabrao Patil

Sarkarnama

मुंबई : भाजपच्या (BJP) प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) या शिवसेनेचे (Shiv Sena) नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर चांगल्याच भडकल्या आहेत. पाटील यांनी खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर वाघ यांनी पाटलांसह शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले आहेत. गुलाबराव पाटील हा तर रांझ्याचा पाटील..अशा खरमरीत शब्दांत वाघ यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

गुलाबराव पाटील यांनी एका प्रचारसभेत म्हटलं होतं की, 'हेमा मालिनी यांच्या गालासारखे सुंदर रस्ते आम्ही तयार केले आहेत.' या वक्तव्यावरून आता चित्रा वाघ संतापल्या असून त्यांनी पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. वाघ यांनी याबाबत ट्विट करत म्हटलं आहे की, गुलाबराव पाटील हा तर रांझ्याचा पाटील...शिवसेेनेच्या नेत्यांना झालंय काय? राऊतानंतर आत्ता गुलाबराव पाटील. त्यांनी हेमा मालिनीबद्दल बेताल वक्तव्य केलं.

<div class="paragraphs"><p>Chitra Wagh, Gulabrao Patil</p></div>
हेमा मालिनींवरून गुलाबराव पाटील अन् खडसेंमध्ये जुंपली

गुलाबराव पाटील-रांझ्याचा पाटील वृत्ती तीच आहे. महाराजांनी त्याची पाटीलकी काढून घेतली. गुलाबरावाची मंत्रीपदावरून हकालपट्टी कधी होणार? शिवीगाळ करणारे संजय राऊत उजळ माथ्यानं फिरताहेत.. गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसताहेत.. पण पोलिस यंत्रणांना यांत महिलांचा विनयभंग दिसत नाही, अशी टीका वाघ यांनी केली आहे.

मी गृहमंत्र्यांना आवाहन करतेय, तात्काळ गुन्हा दाखल करा.. नाहीतर गाल पाहणा-यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही वाघ यांनी दिला आहे. पाटील म्हणाले म्हणाले, 'गेली ३० वर्षे ते या भागातले आमदार आहेत. पण साधे रस्ते ते चांगले करू शकले नाहीत. माझ्या धरणगाव मतदारसंघात या आणि बघा हेमा मालिनी यांच्या गालासारखे सुंदर रस्ते आम्ही केले आहेत.'

दरम्यान, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनीही काही वर्षांपूर्वी रस्त्यांना हेमा मालिनी यांच्या गालाची उपमा दिली होती. तसेच काही दिवसांपूर्वीच राजस्थानमधील काँग्रेसच्या एका मंत्र्यानेही हेमा मालिनी व कतरिना कैफ यांच्याबाबत असं वक्तव्य केलं होतं. त्यावरूनही राजकीय वाद निर्माण झाला होता. हेच वारे आता महाराष्ट्रातही (Maharashtra) वाहू लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com