हेमा मालिनींवरून गुलाबराव पाटील अन् खडसेंमध्ये जुंपली

निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.
Gulabrao Patil, Hema Malini, Eknath Khadse

Gulabrao Patil, Hema Malini, Eknath Khadse

Sarkarnama

जळगाव : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी रस्त्याबाबत अभिनेत्री व खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या सुंदर गालाची उपमा दिली होती. तसेच काही दिवसांपूर्वीच राजस्थानमधील काँग्रेसच्या एका मंत्र्यानेही हेमा मालिनी व कतरिना कैफ यांच्याबाबत असं वक्तव्य केलं होतं. त्यावरूनही राजकीय वाद निर्माण झाला होता. हेच वारे आता महाराष्ट्रातही (Maharashtra) वाहू लागले आहे. निवडणूक (Election) प्रचाराच्या रणधुमाळीत एकमेकांवर टीका करताना राज्यातील नेतेही आता रस्त्यांना हेमा मालिनी यांच्या गालाची उपमा देऊ लागले आहे.

शिवसेना (Shiv Sena) नेते व राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनीही यादव यांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. त्यांनी आपल्या मतदार संघातील रस्ते हेमा मालिनी यांच्या गालासारखे असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना टोला लगावला आहे. तर खडसे यांनीही काम केले म्हणून जनेतेने आपल्याला निवडून दिले आहे, असा टोला पाटील यांना लगावला आहे.

<div class="paragraphs"><p>Gulabrao Patil, Hema Malini, Eknath Khadse</p></div>
अमित शहांनी दगडूशेठ हलवाई गणपतीला घातलं साकडं...

जळगाव (Jalgaon) जिह्यात एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदार संघातील बोदवड नगर पंचायतीची निवडणूक होत आहे. याठिकाणी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. शिवसेना उमेदवाराच्या प्रचाराच्या झालेल्या सभेत पाटील यांनी बोदवड शहरातील रस्त्यावरून एकनाथ खडसे यांना टोला लगावला आहे.

पाटील म्हणाले म्हणाले, 'गेली ३० वर्षे ते या भागातले आमदार आहेत. पण साधे रस्ते ते चांगले करू शकले नाहीत. माझ्या धरणगाव मतदारसंघात या आणि बघा हेमा मालिनी यांच्या गालासारखे सुंदर रस्ते आम्ही केले आहेत.' यावर खडसे यांनीही पलटवार केला. ते म्हणाले, गेली तीस वर्षे मी या भागातून निवडून येत आहे, मी कधीच पराभूत झालो नाही. काम केल्या मुळेच लोकांनी मला निवडून दिले आहे, हे गुलाबराव पाटील यांनाही माहीत आहे, असे खडसे म्हणाले.

<div class="paragraphs"><p>Gulabrao Patil, Hema Malini, Eknath Khadse</p></div>
पंकजा मुंडेंचा बंधू धनंजय मुंडेंवर पुन्हा घणाघात; म्हणाल्या...

दरम्यान, राजस्थानचे (Rajasthan) मंत्री म्हणाले होते की, हेमा मालिनी आता म्हाताऱ्या झाल्या आहेत. आपल्या गावातील रस्ते त्यांच्या गालासारखे नको तर कतरिना कैफच्या गालासारखे गुळगुळीत व्हायला हवेत. यावेळी या मंत्री महोदयांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याकडे पाहत नागरिकांना खूश करण्यासाठी तसे आदेशच देऊन टाकले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com