Devendra Fadnavis and Nawab Malik
Devendra Fadnavis and Nawab MalikSarkarnama

मी आतापर्यंत कुठल्याही मंत्र्याचा राजीनामा मागितला नाही... पण..

BJP|Devendra Fadnavis|mahavikas Aghadi Government : भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहे.

मुंबई : भाजप (BJP) आणि महाविकास आघाडी सरकारचा (Mahavikas Aghadi Government) संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. आज (ता.7 मार्च) राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) लक्षवेधी मांडताना अपेक्षेप्रमाणे राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. भाजपा आमदार गिरीश महाजनांवर मोक्का लावण्यासाठी सरकारी वकील, एसीपी यांच्यामार्फत सरकारने षड्यंत्र रचल्याचा आरोप फडणवीसांना केला. तर देश्याच्या शत्रूशी जमीन व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकांचा (Nawab Malik) राजीनामा घेतला जात नाही. सरकार नेमके कोणाच्या बाजूने आहे, असा सवाल उपस्थित करत राजीनाम्याची मागणी फडणवीसांनी राज्य सरकारकडे केली आहे.

Devendra Fadnavis and Nawab Malik
देवेंद्र फडणवीस नटसम्राटच आहेत!

मुंबई बॅाम्बस्फोट करणाऱ्या गुंड दाऊद इब्राहिमच्या कुटूंबीयाकडून जमीन खरेदी करण्याची गरजच काय होती. दाऊदने कुटूंबीयाच्या मार्फत कोट्यवधी रूपये कमावले आहेत. हे सर्व माहिती असूनही मलिकांनी त्यांच्याशी जमीन व्यवहार केला आहे. दाऊदच्या कुटूंबीयांनी मुंबईतील 3 एकर जागा हडपली आहे. देश्याच्या शत्रूकडून जमीन खरेदी करणाऱ्यावर महाविकास आघाडी सरकारकडून कारवाई केली जात नाही. हे सरकार नेमके कोणाच्या बाजूने आहे. अनिल देशमुख यांच्यावर केस दाखल झाल्यावर लगेच त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात आला तर संजय रोठोड यांच्यावर तर गुन्हाही दाखल करण्यात आला नव्हता तरीही त्यांचे लगेच राजीनामे घेण्यात आले. मात्र, मलिकांना अटक करण्यात आली तरीही त्यांचा राजीनामा सरकारकडून घेण्यात आला नाही. याची मात्र इतिहासात नोंद होईल, अश्या शब्दात फडणवीसांनी राज्यसरकारवर हल्लाबोल केला व मलिकांच्या राजीनाम्याची मागणी अधिवेशनात लावून धरली होती.

फडणवीस म्हणाले, राजीनामे मागण्याची कुठलीही स्पर्धा लागलेली नाही. आम्ही उठसुट कधीच राजीनामे मागत नाही. मी आजपर्यंत कुण्या मंत्र्याचा राजीनामा मागितला नसून मुख्यमंत्र्याचाही राजीनामा मागितला नाही. मात्र, राज्यसरकार देश्याच्या शत्रुशी व्यवहार करणाऱ्यांच्या बाजूने उभे आहे. यामुळे या सरकारची इतिहासात नोंद होईल, असा घणाघात त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

Devendra Fadnavis and Nawab Malik
२३ ते २४ सिमकार्डच्या माध्यमातून चालतोय विद्युत निर्मितीतील भ्रष्टाचार...

दरम्यान, फडणवीस यांनी भाजपा आमदार गिरीश महाजनांवर मोक्का लावण्यासाठी सरकारी वकील, एसीपी यांच्यामार्फत सरकारने षड्यंत्र रचल्याचा आरोप केला. सरकार पोलिसांचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला व त्याचबरोबर विशेष सरकारी वकील चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करणारे व्हिडिओ असलेला एक पेन ड्राईव्ह विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे दिला. त्यामध्ये फडणवीस, महाजन यांच्यासह भाजपच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी सरकारकडून रचण्यात आलेली कट कारस्थाने याचा खुलासा करणारे अनेक व्हिडीओ आहेत, असेही फडणवीसांनी नमूद केले आहे. सुमारे २० ते २५ वेब सीरीज या व्हिडीओच्या माध्यमातून होतील, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com