ठाकरे म्हणाले, 'मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी' अन् फडणवीसांनी लगेच विधानसभेतच पिसं काढली!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी विधानसभेत हजेरी लावत विविध मुद्ये मांडले. यावेळी त्यांनी मुंबईसाठी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी केलेल्या कामांच कौतुक ठाकरेंनी केलं.
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Devendra Fadnavis, Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गुरूवारी विधानसभेत हजेरी लावत विविध मुद्ये मांडले. यावेळी त्यांनी मुंबईसाठी महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सरकारमधील मंत्र्यांनी केलेल्या कामांच कौतुक ठाकरेंनी केलं. यावेळी त्यांनी मुंबईला (Mumbai) सोन्याची अंडी देणारी कोंबडी असंही म्हटलं. हाच मुद्दा पकडत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबई महापालिकेत अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करत सत्ताधारी शिवसेनेची (Shiv Sena) पिसं काढली.

उद्धव ठाकरे हे विधानसभेत उपस्थित असल्याची संधी साधत फडणवीसांनी अनेक घोटाळ्यांबाबत सविस्तर निवेदन केले. त्यांनी मुंबई महापालिकेतील (BMC) घोटाल्यांवर भाष्य करत एकप्रकारे ठाकरे यांनाच लक्ष्य केलं. फडणवीस यांनी महापालिकेत झालेल्या घोटाळ्यांची यादीच सादर करत अनेक आरोप केले. कोविड सेंटर, औषध खरेदी, रुग्णालय इमारत बांधकाम, अग्निशमन वाहन खरेदी, जलाशयाची पुर्नबांधणी, नालेसफाई, टॅब खरेदी अशा अनेक बाबतीत घोटाळे झाल्याचा आरोप फडणवीसांनी केला. (Assembly Session News)

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
मुख्यमंत्र्यांची 'ती' भूमिका पचवायला जडं गेली! अजितदादांनी विधान परिषदेतच सांगितलं

मुख्यमंत्र्यांनी मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हटलं आहे. कोरोना (Covid 19) काळात मुंबईला लुटण्याचं काम करण्यात आलं आहे. मुंबईला लुटत आपली घरी भरली. कोरोना काळात अधिवेशन झालं पण मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक ऑनलाईन झाली. अनेक घोटाळ्यांबाबत तक्रारी केल्या पण कारवाई झाली नाही. नालेसफाई, टॅब खरेदी, रस्ते, चर भरण्यात घोटाळे झाले. याचाच परिणाम आहे की स्थायी समितीच्या अध्यक्षांवर धाड पडली. दोन वर्षात मोठे घोटाळे केले. असं प्रशिक्षण घेऊ नका. असं प्रशिक्षण घेतल्यानंतर ऑर्थर रोड जेलमध्ये जावे लागेल, असा टोला फडणवीसांनी लगावला.

अनेक मोठ्या कंपन्या असताना पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना कंत्राट दिलं गेलं. काळ्या यादीतील कंपन्यांना कंत्राट दिलं. औषध खरेदी करण्यात विलंब करण्यात आला. त्यामुळं रुग्णांवर बाहेरून औषध खरेदी करण्याची वेळ आली. इंजेक्शनसह विविध वैद्यकीय साहित्याच्या खरेदीसाठी नव्या निविदा काढल्या नाहीत. तसेच अनेक कंत्राटं कुठल्याही टेंडरविना महापालिकेनं काढली.

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
नीलम गोऱ्हे अन् दरेकरांमध्ये जोरदार खडाजंगी; धमकीच्या भाषेनं सभागृह दणाणलं

मुलुंड कोविड सेंटरचं काम अस्तित्वात नसलेल्या कंपनीला दिलं. जीएसटी नंबर नसलेल्या कंपनीला कंत्राट दिलं गेलं. कोरोना काळात मुंबई महापालिकेत भयानक घोटाळे झाले. बिल्डर कडे २३०० कोटी मालमत्ता कर थकला ह्यातील एक पैसा वसूल करत नाही. पण एक रुपया थकला की सामान्यांची वीज कापली जाते. असा वेगळा न्याय का, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.

आदित्य ठाकरेंवर निशाणा

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आतापर्यंत आपल्या मतदार संघात वेगवेगळ्या प्रकारचं फर्निचर ज्यात बस स्टॉप, वॉल पेंटिंग, आकर्षक सिग्नल्स लावले आहेत. त्यावरून फडणवीस यांनी आदित्य यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. मुंबई मनपाला प्राणिसंग्रहालय, चौकांची सजावट यात रस आहे. रोज नवीन रेलिंग, नवीन बस स्टॉप बघायला मिळतात. आजकल स्ट्रीट फर्निचर मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं, असं फडणवीस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com