नीलम गोऱ्हे अन् दरेकरांमध्ये जोरदार खडाजंगी; धमकीच्या भाषेनं सभागृह दणाणलं

अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरूवारी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या जोरदार खडाजंगी झाली.
Neelam Gorhe, Pravin Darekar
Neelam Gorhe, Pravin DarekarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरूवारी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) आणि विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्या जोरदार खडाजंगी झाली. गोऱ्हे यांनी बोलता-बोलता थांबवल्यानं दरेकर चांगलेच संतापल्याचे दिसले. त्यांनी थेट गोऱ्हे यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करत अविश्वासाचा ठराव पुन्हा आणण्याचा इशारा दिला. त्यावर गोऱ्हे यांनीही मला धमक्या देऊ नका, असं म्हणत त्यांना उत्तर दिलं. त्यामुळे काही काळ सभागृहातील वातावरण अत्यंत गंभीर बनलं होतं. (Assembly Session)

सभागृहाचे कामकाज सुरू असताना वेळेचा मुद्दा उपस्थित झाला होता. कोणत्या पक्षाचे सदस्य किती वेळ बोलले, याबाबतची माहिती गोऱ्हे यांनी सभागृहात दिली होती. त्यावरून आधीच वाद झाला होता. त्यातच राईट टू रिप्लाय अंतर्गत दरेकर हे बोलण्यास उठले. सहकारातील भेदाभेद आणि साखर कारखान्यांच्या विक्रीतील भ्रष्टाचाराबाबत ते बोलत असताना गोऱ्हे यांनी वेळेची आठवण करून देण्यासाठी बेल वाजवली. (Assembly Session News)

Neelam Gorhe, Pravin Darekar
दरेकरांना एवढं तापलेलं, पेटलेलं कधी बघितलं नव्हतं! अजितदादा झाले अवाक

इथूनच वादाला सुरूवात झाली. बेल वाजल्याचे पाहून दरेकर यांनी थेट मी थांबतो असं म्हणत खाली बसू लागले. त्यावर गोऱ्हे यांनी पंधरा मिनिटे झाली असं सांगितलं. पण त्यानंतर दरेकर चांगलेच संतापले. माझा यावर आक्षेप आहे, आपण जाणीवपूर्वक असं करत आहे. विरोधी पक्षाच्या सभासदांना आज बोलायला मिळालं नाही. आम्ही सहन केलं कारण दादा उत्तर देणार होते. राईट टू रिप्लाय हा माझा अधिकार आहे, असं दरेकर म्हणाले.

दरेकरांचा हा आक्रमक पवित्रा पाहिल्यानंतर 'किती वेळ लागणार आहे अजून, 15 मिनिटे झाली,' असं गोऱ्हे म्हणाल्या. त्यावर दरेकर खूपच संतापले. अजून 10-15 मिनिटे लागतील, वेळ नसेल तर बसतो. पूर्णवेळ वाचवतो. आपल्या कामकाजावरच माझा आक्षेप आहे. आपण पक्षपातीपणे विरोधकांशी वागत असल्याचा आरोप दरेकरांनी केला. म्हणून आम्ही अविश्वासाचा ठराव आणला होता. गरज पडली तर पुन्हा आणू, असा इशाराच दरेकरांनी दिला.

Neelam Gorhe, Pravin Darekar
मुख्यमंत्र्यांची 'ती' भूमिका पचवायला जडं गेली! अजितदादांनी विधान परिषदेतच सांगितलं

दरेकरांच्या या आक्रमकतमुळे सभागृहात काहीकाळ शांतत पसरली. पण गोऱ्हे यांनीही 'तुम्ही मला धमक्या देऊ नका,' असं म्हणत प्रत्युत्तर दिलं. दोघांमधील वाद पाहिल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी मध्यस्थी केली. सभागृहाच्या प्रथा परंपरा विचारात घेऊन सभापतींचा अधिक्षेप होणार नाही, याची दक्षता घ्यावी. दरेकरांचे वक्तव्य कामकाजातून काढून टाकावे, असं वळसे पाटील म्हणाले.

वळसे पाटलांचे बोलून झाल्यानंतर पुन्हा दरेकर बोलण्यास उठले. सभागृहात सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका असली पाहिजे, असं दरेकर म्हणताच गोऱ्हेही आक्रमक झाल्या. अहो, पण वेळ किती आहे, हे विचारलं. मी काय गुन्हा केला, असा सवाल त्यांनी केला. त्यावर गुन्हा नाही, तुम्ही व्यत्यय आणता प्रत्येकवेळी, असं दरेकर म्हणाले. व्यत्यय कसा, माझं मी काम करतेय, असं उत्तर गोऱ्हेंनी दिलं. तसंच तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ बोला, आपण तुमचं बोलणं संपेपर्यंत सभागृह सुरू ठेवू, असं सांगत गोऱ्हेंनी एक पाऊल मागे घेतलं. त्यानंतर दरेकरांनी काही मिनिटांतच आपलं बोलणं संपलं. पण तोपर्यंत गोऱ्हे यांनी सभापतींना सभागृहात येण्याचा निरोप पाठवला होता. मी अत्यंत व्यथित झाले आहे. त्यामुळे सभापतींना बोलवून घेतलं असल्याचं त्यांनी सदस्यांना सांगितलं. काही मिनिटांच्या या वादामुळं सभागृहाचं वातावरण काहीकाळ गंभीर बनलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com