जे कायदेशीर ते होईल! फडणवीसांनी सांगितले उकेंवरील कारवाईचे कारण...

जमीन गैरव्यवहारप्रकरणी अमलबजावणी संचालनालयाने गुरूवारी अॅड. सतिश उके आणि त्यांचे बंधू प्रदीप यांना अटक केले आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis sarkarnama

मुंबई : जमीन गैरव्यवहारप्रकरणी अमलबजावणी संचालनालयाने (ED) गुरूवारी अॅड. सतिश उके (Satish Uke) आणि त्यांचे बंधू प्रदीप यांना अटक केले आहे. त्यांना मुंबईत आणण्यात आले दुपारी विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे. ही कारवाई राजकीय हेतूने केली असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला आहे. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली.

उके यांच्यावर सुमारे 11.5 कोटी रुपयांच्या मनीलाँर्डिंग प्रकरणात कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. उके यांनी फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. 2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये फडणवीस यांनी फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. उके यांनी भाजपचे नेते चंद्रशेखर बानवकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर पटोले यांची बाजू उके मांडत आहेत.

Devendra Fadnavis
सतिश उकेंना अटक अन् वकिलांचा 'ईडी'वर केला गंभीर आरोप

यापार्श्वभूमीवर उकेंवरील कारवाई राजकीय असल्याचा आरोप काँग्रेससह इतर पक्षांकडून केला जात आहे. त्यानंतर फडणवीस यांनी शुक्रवारी या कारवाईवर पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली. फडणवीस म्हणाले, एका जमिनीच्या प्रकरणात नागपूरच्या पोलिसांनी त्यांच्या विरुध्द एक गुन्हा दाखल केला होता. ज्या गुन्हायात ईडीला तक्रार झाली. त्या गुन्ह्यातच तक्रार झाली. मुळ तक्रार नागपूर पोलिसांची आहे.

त्यांच्याविरूध्द 2005 पासून अनेक गुन्हे आहेत. वेगवेगळ्या न्यायाधीशांची खोटी तक्रार केल्याबद्दल त्यांच्याविरूध्द कोर्ट ऑफ कंटेम्प्ट झाला. न्यायालयानं त्यांना शिक्षा दिली. सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर ती शिक्षा का वाढवण्यात येऊ नये, असा निर्णय दिला. आता ते प्रलंबित आहे. जे काही कायदेशीर आहे ते होईल. ते ईडी करत आहे, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. फडणवीस यांनी काँग्रेसच्या आरोपांवर भाष्य केलं नाही.

Devendra Fadnavis
महाडिकांविषयी भाजपमध्ये नाराजी; 'स्त्रीने शत्रू तुडवला' म्हणत चित्रा वाघही भडकल्या

दरम्यान, नागपूरमधील घरी सुमारे सहा तासांच्या चौकशीनंतर ईडीने उके व त्यांच्या बंधूना गुरूवारी सकाळी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याच संध्याकाळी त्यांना विमानाने मुंबईत आणण्यात आले. मुंबईतही त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्या रिमांडसाठी विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे. पण तत्पुर्वी शुक्रवारी सकाळी उके यांचे वकील ईडी कार्यालयात गेले होते. पण त्यांना भेटू दिले गेले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com