सतिश उकेंना अटक अन् वकिलांचा 'ईडी'वर केला गंभीर आरोप

जमीन गैरव्यवहारप्रकरणी अमलबजावणी संचालनालयाने अटक कलेले अॅड. सतिश उके आणि त्यांचे बंधू प्रदीप यांना मुंबईत आणण्यात आले आहे.
Ad. Satish Uke
Ad. Satish UkeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : जमीन गैरव्यवहारप्रकरणी अमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक कलेले अॅड. सतिश उके (Satish Uke) आणि त्यांचे बंधू प्रदीप यांना मुंबईत आणण्यात आले आहे. मुंबई कार्यालयातही त्यांची चौकशी सुरू असून दुपारी त्यांना विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यांच्यावर सुमारे 11.5 कोटी रुपयांच्या मनीलाँर्डिंग (Money Laundering) प्रकरणात कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ईडीकडून योग्यपध्दतीने कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांच्या वकिलांनी केला आहे.

नागपूरमधील (Nagpur) घरी सुमारे सहा तासांच्या चौकशीनंतर ईडीने उके व त्यांच्या बंधूना गुरूवारी सकाळी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याच संध्याकाळी त्यांना विमानाने मुंबईत आणण्यात आले. मुंबईतही त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्या रिमांडसाठी विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे. पण तत्पुर्वी शुक्रवारी सकाळी उके यांचे वकील ईडी कार्यालयात गेले होते. पण त्यांना भेटू दिले गेले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Ad. Satish Uke
महाडिकांविषयी भाजपमध्ये नाराजी; 'स्त्रीने शत्रू तुडवला' म्हणत चित्रा वाघही भडकल्या

उके यांच्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सतिश उके व त्यांच्या बंधूंना मुंबईत घेऊन आले आहेत. ईडी ही स्वत:चीच प्रक्रिया करत आहे. कायद्यावर कोणतीही संस्था नाही. पण त्यांच्याकडून कायदेशीर प्रक्रिया पार पाडली गेली नाही. त्यांनी मला 30 ते 40 मिनिटे बाहेर थांबायला लावले. पण त्यानंतर मला आतमध्ये येऊ दिले नाही. आम्ही या सर्व बाबी न्यायालयासमोर मांडू. न्यायालय यावरून योग्य तो निर्णय घेईल, असं उके यांच्या वकिलांनी स्पष्ट केलं.

प्रदीप उके हे माजी पोलीस कर्मचारी असून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलेले आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयातील माजी न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तेव्हापासून ते चर्चेत आले होते. तसेच उके यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विरोधात निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. 2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये फडणवीस यांनी फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे.

Ad. Satish Uke
महाडिकांच्या वादग्रस्त वक्तव्यानं कोल्हापूरचं राजकारण तापलं!

जमीन प्रकरणात उकेंवर गुन्हा

काही दिवसांपूर्वी उके यांच्यावर एका 60 वर्षीय वृध्देने आपल्याला धमकावरून जमीन बळकावल्याचा आरोप केला होता. उके यांनी दीड एक जमीन स्वत:च्या व भावाच्या नावावर केल्याचा आरोप वृध्देनं केला होता. काही वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी उके यांना ताब्यात घेतलं होते. त्यांच्या चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पण त्यानंतर त्यांच्यावर कुठलाही कारवाई झाली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com