गोपीनाथ मुंडे असते तर, युती कायम राहिली असती!

"शिवसेना काय आहे हे फक्त गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनाच कळली होती. आज ते असते तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे सारखा एकही नेता आज नाही,"
Gopinath Munde, sanjay Raut
Gopinath Munde, sanjay Rautsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ''बहुजन समाजाच्या नेतृत्वाची सुरुवात गोपीनाथ मुंडे यांनी केली. शिवसेना काय आहे हे फक्त गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनाच कळली होती. आज ते असते तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे सारखा एकही नेता आज नाही," असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay Raut) म्हणाले.भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज वाढदिवस आहे, यानिमित्ताने राऊत माध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८१ वा वाढदिवस. याबाबत राऊत म्हणाले, ''शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राला दूरदृष्टी लाभलेल नेतृत्व आहे. तेदेशाचे संरक्षणमंत्री आणि कृषिमंत्री असताना आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी त्यांनी पहिलं पाऊल उचललं होते,''

''शरद पवार हे जनतेशी थेट संवाद असलेले हवेत गप्पा न मारणारे आणि आजही तरुणांना लाजवतील अस काम करणारे नेते आहेत. राज्यात आज जो महाविकास आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रात सुरू आहे तो त्यांच्या नेतृत्वामुळे सफल झाला आहे,'' असे राऊत म्हणाले.

Gopinath Munde, sanjay Raut
आरोग्य विभागाच्या परीक्षेसारखचं 'म्हाडा'चं झालं, आमची मानसिकता खचत आहे..

पवारांना मी खुर्ची का दिली

शरद पवार यांच्या भाषणांचा संग्रह असलेल्या ‘नेमकची बोलणे’ हा ग्रंथ राष्ट्रवादी मासिकाचे संपादक सुधीर भोंगळे यांनी लिहिला आहे. त्याचे प्रकाशन खासदार संजय राऊत, ज्येष्ठ साहित्यीक रंगनाथ पठारे यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते शनिवारी (ता. ११ डिसेंबर) मुंबईत झाले. यावेळी राऊत म्हणाले, "मी दिल्लीत शरद पवारांना बसायला खुर्ची दिली, त्याबद्दल माझ्याबाबत बरंच काही बोललं गेलं. अनेकांनी टिकाटिपण्णी केली. जे विकृतपणे माझ्यावर टीका करत होते, त्यांना हे पुस्तक वाचल्यावर कळेल की पवारांना मी खुर्ची का दिली. त्यांचा तो मान आहे. पण, आपल्या देशात सध्या विकृत राजकारण सुरू आहे, त्याच्यावरसुद्धा पवारांनी २५ ते ३० वर्षांपूर्वी कोरडे ओढले आहेत, हे आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून दिसून येते,''

''मी दिल्लीत ज्येष्ठ नेते शरद पवारांना (sharad pawar) बसायला खुर्ची का दिली, हे समजून घ्यायचे असेल तर त्यांनी पवारांची ६१ भाषणे वाचायली पाहिजेत. जे टीकाकर आहेत, जे विकृतपणे टीका करत होते, त्यांना हे पुस्तक वाचल्यावर कळेल की माझ्यासारख्या सामान्य लेखकाने, पत्रकाराने आणि कार्यकर्त्याने पवारांना खुर्ची का दिली. त्यांचा तो मान आहे. त्यांच्या विद्‌वत्तेचा मान आहे,'' अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी टीकाकरांना पुन्हा एकदा सुनावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com