कर्जत : कर्जत तालुक्यातील वैजनाथ देवस्थानमध्ये जमीन गैरव्यवहार झाल्याचे सांगत यामध्ये महाविकास आघाडीतील एका बड्या नेत्याचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी दोन दिवसापूर्वी केला होता. वैजनाथ येथे देवस्थान जमीन पाहणी आणि चौकशी करण्यासाठी सोमय्या दोन दिवसापूर्वी गेले होते.
आज सोमय्या पुन्हा वैजनाथ येथे आले होते. त्यांनी यावेळी वैजनाथ देवस्थान जमीन गैरव्यवहाराबाबत मोठा गैाप्यस्फोट केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या परिवारावर त्यांनी गंभीर आरोप केले. सोमय्यांनी आज कर्जत येथे धरणे आंदोलनही केलं.
''वैजनाथ देवस्थान जमिनीचा घोटाळा झाला त्याची चौकशी करा, ही जमीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Sridhar Patankar) यांच्या नावावर गेली कशी याची चौकशी करा,'' अशी मागणी किरीट सोमय्या यांची शुक्रवारी केली. त्यांनी आज कर्जत तहसीलदारांना याबाबतचे निवदेन दिले.
कर्जत तालुक्यातील वैजनाथ येथील शंकराचे देवस्थान प्रसिद्ध आहे. महाशिवरात्रीला येथे जत्राही भरते. अशा या देवस्थानची जमीन गैरव्यवहार करून एका सलीम नावाच्या व्यक्तीच्या नावावर केली आणि त्यानंतर ती जमीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या नावावर करण्यात आली अशी माहिती किरीट सोमय्या यांनी यावेळी पत्रकारांना दिली.
कर्जत-कल्याण राज्य मार्गावरील असलेले अनधिकृत असलेले शिवसेनेचे कार्यालय आणि एक मोठे हॉटेल यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकार्यांकडे केली असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी किरीट सोमय्या हे मनोरंजन करतात असे म्हटले होतं त्यावर तितक्याच मिश्किलपणे किरीट सोमय्या यांनी त्यांचा समाचार घेतला. याबाबत ते म्हणाले की, १८ लोकांवर कारवाई सुरू आहे. अर्धा डझन जेलमध्ये गेले आहेत. हे नबाब मालिकांना मनोरंजन वाटतं का ? अनिल देशमुख हे जेलमध्ये होते हे मनोरंजन होत, नवाब मलिक यांची मुलगी आणि जावई जेलमध्ये होते हे मनोरंजन होते,'' असंही किरीट सोमय्या म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.