फडणवीसांवरील मलिकांचे आरोप खरे ठरल्यास भाजपचा बडा नेता घेणार संन्यास

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आता भाजपच्या विरोधात मोहीम उघडली होती.
Mangal Prabhat Lodha and Devendra Fadnavis
Mangal Prabhat Lodha and Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मागील काही दिवस अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या (NCB) विरोधात मोहीम उघडली होती. आता त्यांनी भाजपकडे (BJP) मोर्चा वळवला आहे. त्यांनी आज भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे भाजपचे नेते संतापले आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी तर मलिकांचे आरोप खरे ठरल्यास संन्यास घेण्याची घोषणा केली आहे.

नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्ज विक्रेत्यांशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. यावरुन आता भाजपने मलिक यांच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. यानंतर अनेक भाजप नेत्यांनी मलिक यांना लक्ष करण्यास सुरवात केली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष लोढा यांनी तर सगळ्यांच्या पुढे एक पाऊल टाकले आहे. मलिकांच्या आरोपात एक टक्का तथ्य आढळल्यासही मी राजकीय व सामाजिक जीवनातून संन्यास घेईन, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

आरोपांत तथ्य न आढळल्यास मलिक यांनी फडणवीस यांच्या कुटुंबाची माफी मागावी, अशीही मागणी लोढा यांनी केली आहे. जनतेची दिशाभूल करण्यासाठी मलिक हे प्रशासकीय अधिकारी आणि नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करीत आहेत, असा आरोपही लोढा यांनी केला आहे. राज्यातील 12 कोटी जनतेचा फडणवीस यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर विश्वास आहे. महाराष्ट्र भ्रष्टाचार व अत्याचाराने होरपळला गेला आहे. याकडे दुर्लक्ष करून मलिक हे दुसऱ्यावर आरोप करण्यात आपला वेळ वाया घालवत आहेत, अशी टीकाही लोढा यांनी केली.

Mangal Prabhat Lodha and Devendra Fadnavis
अखिलेश यादव विधानसभा लढणार की नाही? अखेर समाजवादी पक्षाचा मोठा खुलासा

नवाब मलिक यांनी आज सकाळी पत्रकार परिषद देऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. अमृता फडणवीस यांच्यावर 'मुंबई रिव्हर अँथम' या व्हिडिओ चित्रीत केला आहे. यात नदी स्वच्छता मोहिमेवर अमृता फडणवीस यांनी हे गाणं तयार केलं होते. या गाण्याचा फायनान्स हेड हा जयदीप राणा असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितलं होते. मलिक यांनी टि्वट करीत याचा पुरावा दिला होता.

Mangal Prabhat Lodha and Devendra Fadnavis
एनसीबीवर ताशेरे ओढून मुकुल रोहतगी म्हणाले...

नवाब मलिकांच्या आरोपानंतर आता युट्यूबवर 'मुंबई रिव्हर अँथम' या व्हिडिओच्या श्रेयनामावलीमध्ये जयदीप राणा याचे नाव काढून टाकण्यात आले आहे. सकाळी मलिक यांनी टि्वट केल्यानंतर जयदीप राणाचे अचानक का गायब झाले याची चर्चा सध्या सुरु आहे. फडणवीस यांच्याकडून ड्रग्ज रॅकेटला संरक्षण मिळत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला असून, याची सीबीआय किंवा न्यायालयीन समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com