अखिलेश यादव विधानसभा लढणार की नाही? अखेर समाजवादी पक्षाचा मोठा खुलासा

समाजवादी पक्षाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी विधानसभा निवडणूक न लढण्याची घोषणा केली.
Akhilesh Yadav
Akhilesh YadavSarkarnama
Published on
Updated on

लखनौ : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) पुढील वर्षाच्या सुरवातीला विधानसभा निवडणूक (Assembly Election) होत आहे. या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यातच आज समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) प्रमुख व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी विधानसभा निवडणूक न लढण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे मोठी खळबळ उडाली असून, अखेर यावर समाजवादी पक्षाने खुलासा केला आहे.

अखिलेश यादव यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात अनेक मोठ्या घोषणा आज केल्या. त्यातील सर्वांत मोठी घोषणा म्हणजे त्यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अखिलेश यादव हे आझमगडमधून लोकसभेवर निवडून गेले आहेत. याआधी त्यांनी कधीही विधानसभा निवडणूक लढवलेली नाही. ते आता पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहेत. त्यांच्या या घोषणेमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. समाजवादी पक्षातीलच अनेक नेत्यांनी या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले.

अखेर समाजवादी पक्षाने याबाबत खुलासा केला आहे. अखिलेश यादव यांचे निकटवर्ती सहकारी आशिष यादव म्हणाले की, उत्तर प्रदेशातून भाजपचे नामोनिशाण संपून जाणार आहे. उत्तर प्रदेशातील जनता समाजवादी पक्षासोबत आहे. अखिलेश यादव निवडणूक लढणार अथवा नाही याचा निर्णय पक्षच घेईल.

Akhilesh Yadav
एनसीबीवर ताशेरे ओढून मुकुल रोहतगी म्हणाले...

उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांनी 2012 आणि 2017 मध्येही विधानसभा निवडणूक लढवलेली नव्हती. समाजवादी पक्षाला 2012 मध्ये मोठा विजय मिळाला होता. त्यावेळी 38 वर्षांचे अखिलेश हे देशातील सर्वांत तरुण मुख्यमंत्री बनले होते. त्यावेळी ते कनौजमधून लोकसभेवर निवडून गेले होते. नंतर ते विधान परिषदेवर गेले होते. यामुळे रिक्त झालेल्या कनौजच्या जागेवर त्यांच्या पत्नी डिंपल यादव या लोकसभेत निवडून गेल्या होत्या.

Akhilesh Yadav
वानखेडेंना अडचणीत आणणाऱ्या प्रभाकर साईलचा आणखी एक गौप्यस्फोट

राष्ट्रीय लोक दलासोबत (आरएलडी) जागावाटप आघाडी अंतिम झाल्याची घोषणाही अखिलेश यादव यांनी आज केली. लवकरच जागावाटप होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव यांच्या प्रगतीशील समाजवादी पक्ष लोहिया या पक्षासोबत आघाडी करण्याबाबतही त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. याबाबत माझी कोणतीही हरकत नसून, ते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाईल, असेही अखिलेश यादव यांनी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com