BJP Vs Shinde Shiv Sena : भाजप-शिवसेना वादाच्या ठिणगीवर 'पेट्रोल'चं ओतलं; यामिनी जाधवांचं 1000 बुरखा वाटप, आशिष शेलार म्हणाले...

BJP leader Ashish Shelar criticizes Shiv Sena MLA Yamini Jadhavs distribution of burqas : शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी भायखळ्यातील बुरखा वाटपावर भाजप नेते आशिष शेलार यांची टीका.
BJP Vs Shinde Shiv Sena
BJP Vs Shinde Shiv SenaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भायखळ्याच्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी 1000 बुरखा वाटल्यावरून महायुतीमधील सर्वात मोठा पक्ष भाजप नाराज झाला आहे.

भाजप नेते तथा मुंबई प्रदेशाध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी यावर नाराजीच्या सूरात प्रतिक्रिया देत, शिवसेना शिंदे गटाला फटकारलं. 'नेमका काय कार्यक्रम झाला, याची मला कल्पना नाही. पण बुरखा वाटपासारखे कार्यक्रम भाजपला मान्य नाहीत', अशा शब्दात आमदार शेलारांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या या कार्यक्रमाला फटकारलं.

महायुतीतील भाजप (BJP) आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटात गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू आहे. शिवसेना आमदारांच्या कृतीमुळे आणि विधानांमुळे वादाच्या ठिणग्या उडतच आहेत. पण, भाजप आणि शिवसेनेच्या वादाच्या ठिणग्या उडत असतानाच आमदार यामिनी जाधव यांनी बुरखा वाटप कार्यक्रम घेत वादच्या ठिणग्यांवर पेट्रोलचं टाकलं. आता याचा महायुतीत भडका उडाला असून, त्याची झळ कुठपर्यंत आणि कोणाकोणाला बसते, याची चर्चा आता रंगली आहे.

BJP Vs Shinde Shiv Sena
Shiv Sena Leader's Prediction : ‘भाजपला विदर्भात केवळ 13-14 जागा मिळतील; फडणवीसांनाही निवडणूक सोपी नाही’

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. महाविकास आघाडीला लोकांचं, मतदारांचं झुकतं माप मिळू लागलं आहे. यामुळे महायुतीमधील भाजपसह मित्रपक्ष अस्वस्थ आहे. विशेष करून शिवसेना शिंदे (Eknath Shinde) गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील विद्यमान आमदारांमध्ये अस्वस्थता वाढलीय. यातून या दोन्ही गटातील आमदार मतदार संघात राहून मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम हाती घेत आहे. असाच कार्यक्रम भायखळ्याच्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी घेतला. त्यांनी मतदार संघात 1000 बुरखा वाटप केलं. आता या बुरखा वाटपावरून महायुतीत वाद पेटला आहे.

BJP Vs Shinde Shiv Sena
Solapur Shivsena Melava : काँग्रेसच्या मतदारसंघातून संजय राऊतांनी शिवसेनेच्या उमेदवारीची मशाल पेटवली...

भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांनी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. लोकसभा निवडणुकीत यामिनी जाधव यांचा अरविंद सावंत यांच्याकडून 52 हजार मतांनी पराभव झाला होता. भायखळा विधानसभा मतदारसंघात यामिनी जाधव यांचं मताधिक्य घटलं. यातून त्यांनी मतदारसंघातील मुस्लिम मतदारांसाठी बुरखा वाटप कार्यक्रम घेतला. परंतु या कार्यक्रमावर महायुतीतील भाजप आणि महाविकास आघाडीकडून टीका होऊ लागली आहे.

भाजपला मान्य नाही : आशिष शेलार

भाजपने या कार्यक्रमावर आक्षेप घेतला असून मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी या कार्यक्रमावर टीका केली आहे. 'नेमका काय कार्यक्रम झाला, याची कल्पना नाही. परंतु बुरखा वाटप सारखे कार्यक्रम भाजपला मान्य नाही', असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

स्वार्थी आणि दुटप्पी : अंधारे

महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने महायुतीवर यावरून टीका सुरू केली आहे. शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधार यांनी यामिनी जाधव यांच्या राजकारणाला स्वार्थी आणि दुटप्पी म्हटलं आहे. लोकसभेला मुस्लिमांची मते मिळाली नाहीत, म्हणून, एका बाजूल रडायचं आणि दुसऱ्या बाजूला मुस्लिमांविरोधात द्वेष पसरवायचा. आता मुस्लिम मतपेटीला आकर्षित करण्यासाठी आमदार यामिनी जाधव बुरखा वाटप करत आहेत, अशी टीका केली.

काळजी घ्यावी लागते : आमदार जाधव

आमदार यामिनी जाधव म्हणाल्या, "आमच्या मतदारसंघात 50 टक्के मुस्लिम समाज राहतो. आम्हाला आमच्या मतदार संघात काळजी घ्यावी लागते. मुस्लिमांसाठी काहीतरी करावे, या कल्पनेतून बुरखा वाटप केलं. मित्रपक्षांचा वेगळा दृष्टीकोन असू शकतो, पण आम्हाला आमच्या मतदारसंघाची काळजी घ्यावीच लागणार आहे".

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com