Solapur Shivsena Melava : काँग्रेसच्या मतदारसंघातून संजय राऊतांनी शिवसेनेच्या उमेदवारीची मशाल पेटवली...

South Solapur Assembly Constituency : अमर पाटील यांचं कौतुक करावसं वाटतं. निवडणुकीच्या तारखा अजून जाहीर झालेल्या नाहीत. पण तुम्ही कामाला लागला आहात. मी लढणार आणि जिंकणार, असा आत्मविश्वास पाहिजे.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 12 September : आगामी विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या रक्षणाची आणि अस्मितेची लढाई आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघाचा उमेदवार हा तुमच्याच मनातीलच असणार आहे. मात्र, या मतदार संघात मशाल पेटली पाहिजे. आपण इतक्या संख्येने सभेला आला आहात त्यामुळे मला तर वाटलं ही अमर पाटील यांच्या विजयाची सभा आहे असे सांगून खासदार संजय राऊत यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामधून अमर पाटील यांची अप्रत्यक्षपणे उमेदवारीच जाहीर केली.

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा मेळावा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या उपस्थितीत झाला. त्या मेळाव्या बोलताना दक्षिण सोलापूर मतदारसंघावर दावा करत उमेदवारीही जाहीर करून टाकली. ते म्हणाले, नांदेडपासून सोलापूरपर्यंत जागोजागी शिवसैनिकांनी जे स्वागत केले, ते पाहिल्यावर आपल्या राजकीय विरोधकांची झोप उडाली असेल.

अमर पाटील यांचं कौतुक करावसं वाटतं. निवडणुकीच्या तारखा अजून जाहीर झालेल्या नाहीत. पण तुम्ही कामाला लागला आहात. मी लढणार आणि जिंकणार, असा आत्मविश्वास पाहिजे. सगळे घाव झेलून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हा पठ्ठ्या महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे, असे राऊत यांनी सांगितले.

सोलापूरचे प्रश्न जसेच्या तसें आहेत. अमर पाटील यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून जे काम के ते येथील आमदार-खासदाराला करता आले नाही. सोलापुरात एमआयडीसी नाही; म्हणून उद्योग नाहीत, पाण्याचा प्रश्न आहे. हे प्रश्न सोडवायचे असतील तर दक्षिण सोलापुरात शिवसेनेचा आमदार निवडून आणला पाहिजे, असे आवाहन राऊत यांनी केले.

ते म्हणाले, शिवसेना आणि धनुष्यबाण डोळ्यासमोर चोरांनी चोरून नेलं, मोदी त्या चोरांचे सरदार आहेत. धनुष्यबाण गेला, मात्र आता हाती मशाल घेतली आहे. जेव्हा आमचा पक्ष चोरून नेला, तेंव्हा संपूर्ण राज्यात अमर पाटील यांच्यासारखे निष्ठावंत उद्धव ठाकरेंसोबत उभे टाकले. त्यामुळेच नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या 400 पार ला बूच लावण्याचे काम महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंनी केले आहे.

Sanjay Raut
Sitaram Yechury : ...अन्‌ सीताराम येचुरी सोनिया गांधींच्या दारातच कोसळले; नरसय्या आडम मास्तरांना अश्रू अनावर

मिंद्यांनी 5 जागा चोरल्या

महाराष्ट्रातील 5 जागा मिंद्यांनी चोरल्या नायतर आम्ही 40 पर्यंत गेलो असतो. दिल्लीवरून फोन आला आणि निकाल फिरवला. देशातील 60 ते 70 जागांचे निकाल त्यांनी फिरवले आहेत. मात्र त्यांचा पराभव झालेला आहे. विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकल्या आहेत, देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न आहे, असा आरोपही राऊतांनी केला.

पोलिस अधिकाऱ्यांना इशारा

आमच्या शिवसैनिकांना बॅनर्स लावू दिले नाहीत. पोलिसांनी सोलापुरात दडपशाही केली, असं कळलं फक्त 2 महिने थांबा. एवढी मस्ती अधिकाऱ्यांनी दाखवू नये. सत्ता येते सत्ता जाते. आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करणारे अधिकारी आमच्या दारासमोर उभे टाकणार आहेत. प्रत्येकाची नोंद ठेवली जाईल.

अन्यायाचा कडेलोट करण्याचा मार्ग आम्हाला छत्रपतींनी दाखवला आहे. उद्या सत्ता आमच्या हातात येणार आहे आणि तुम्हाला आम्हालाच सॅल्यूट मारायचा आहे, हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवा, असा इशारा त्यांनी नाव न घेता सोलापूर पोलिस आयुक्तांना इशारा दिला.

छत्रपतींच्या पुतळ्यात भ्रष्टाचार

राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मोदीच्या उपस्थित राहिला आणि वाऱ्यामुळे पडला, त्या पुतळ्यातही भ्रष्टाचार झाला आहे. या लोकांना राज्य करण्याचा अधिकार नाही. छत्रपतींच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणाऱ्यांनी राज्याचा स्वाभिमान मोदींकडे गहाण टाकला. हे सरकार राहता कामा नये. त्यांनी शिवसेना तोडली, त्यामुळे त्यांना महाराष्ट्र लुटायला मिळाला आहे. गुजराती व्यापार मंडळाचे हे धोरण आहे

अचानक बहिणी लाडक्या झाल्या

अचानक बहिणी सरकारच्या लाडक्या झाल्या आहेत. निवडणूक आल्या की लाडक्या बहिणीची किंमत फक्त 1500 रुपये केली आहे. 1500 रुपये घ्यायचे. ते शिंदे आणि फडणवीसच्या घराचे नाहीत. अजित पवार उपकार करत नाहीत. 1500 तुम्हारा, वोट हमारा. दोन महिन्यांनी आमचं सरकार येईल, तेव्हा 1500 चे आम्ही 3000 करू. लाडक्या बहिणीचे फायदे कसे घ्यायचे, हे आम्हाला माहिती आहे.

Sanjay Raut
Sushilkumar Shinde's grandson : सुशीलकुमार शिंदेंच्या सेलिब्रिटी नातवाची विधानसभेसाठी सोलापूरमध्ये चर्चा!

सरन्यायाधीशांवर निशाणा

देशाचे सरन्यायाधीश कधीही राजकीय नेत्याला घरी बोलावत नाहीत. नरेंद्र मोदी मात्र त्यांच्या घरी गेले आणि आरती केली, तेव्हा आम्हाला खात्री पटली की पळून गेलेले 40 आमदार अपात्र का ठरवू शकत नाहीत. न्यायाधीश झुकत असतील तर आम्हाला न्याय कसा मिळणार. गेली 3 वर्षे फक्त तारखा दिल्या जात आहेत. न्याय व्यवस्था स्वातंत्र आणि निष्पक्ष असली पाहिजे. मात्र, न्याय व्यवस्थेच्या एका तराजूत मोदी बसले आहेत आणि दुसरा रिकामा आहे.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com