राज ठाकरेंची घोषणा अन् लगेचच भाजपच्या अब्जाधीश नेत्याची ऑफर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडीपाडवा मेळाव्यात मोठी घोषणा केली होती.
Mohit Kamboj
Mohit Kambojsarkarnama

नवी दिल्ली : मशिदींवर लागलेले भोंगे उतरवावेच लागतील. भोंगे काढले नाही तर मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावू, असा इशारा मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुडीपाडवा मेळाव्यात दिला होता. त्यावरून सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) राजकारण तापलं असून यात भाजपनेही (BJP) उडी घेतली आहे. यानंतर भाजपच्या अब्जाधीश नेत्याने तर जनतेला मोठी ऑफरच दिली आहे.

भाजपचे मुंबईतील नेते मोहित कंबोज भारतीय यांनी ही ऑफर दिली आहे. कंबोज हे सोन्याचे मोठे व्यापारी आहेत. ज्यांना कुणाला मंदिरावर भोंगे लावायचे आहेत, त्यांना ते मोफत देण्याची घोषणा कंबोज यांनी ट्विटरवर केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मंदिरावर हनुमान चालिसा यासाठी भोंगे ज्यांना लावायचे आहेत त्यांना आम्ही देऊ. हिंदू एकतेचा आवाज आलाच पाहिजे. जय श्री राम ! हर हर महादेव !

Mohit Kamboj
पेट्रोल परवडेना म्हणून घोड्यावरून वीजबिल वसुली केली अन् नोकरीवरच गदा!

राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर काँग्रेससह (Congress) शिवसेना (Shiv sena) व राष्ट्रवादीनेही (NCP) जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज यांच्यावर शरसंधान साधत राज्यातील वातावरण पेटेल, अशाप्रकारे बोलू नका, असं आवाहन केलं आहे. इतर नेत्यांकडून ठाकरेंचा समाचार घेण्यात आला आहे. भाजपने लिहून दिलेल्या स्क्रिप्टनुसार हे भाषण असल्याचा टोला शिवसेनेने लगावला आहे. दरम्यान, राज यांच्या वक्तव्यानंतर 3 एप्रिलला मनसेच्या चांदिवली विधानसभा मतदार संघांचे महेंद्र भानुशाली यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर भोंगे लावत हनुमान चालिसा लावला. चिरागनगर पोलिसांनी (Police) मनसे कार्यकर्त्यांना अगोदर समज दिली. पण पोलिसांनी समज देऊनही भोंगे न उतरवल्यामुळे अखेर पोलिसांनीच मनसेच्या कार्यालयाबाहेर लावलेले भोंगे उतरवले आणि महेंद्र भानुशाली यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Mohit Kamboj
वाढता वाढता वाढे..! पंधरा दिवसांत पेट्रोल, डिझेल तेरा वेळा महागलं

काय म्हणाले होते राज ठाकरे?

राज ठाकरेंनी शनिवारी गुडीपाडवा मेळाव्यात राज्य सरकारला मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही त्यासमोर हनुमान चालिसा लावू, असा इशारा दिला होता. पंतप्रधानांना विनंती करताना ते म्हणाले होते की, तुम्ही ईडी, इन्कम टॅक्सच्या धाडी टाकता आहात ना. पोलिसांना विचारा. झोपडपट्ट्यातल्या मदरशांवर धाडी टाका. काय काय हाती लागेल. प्रार्थनेला विरोध नाही, पण मशिदींवर लागलेले भोंगे उतरवावेच लागतील. भोंगे काढले नाही तर मस्जिदींवर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावू, असा इशाराही राज यांनी दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com