Murji Patel: आता माघार नाही, भाजप नेता मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला; उमेदवारीवरुन रस्सीखेच

Andheri East Assembly Election 2024: स्विकृती शर्मा यांनी काही महिन्यापूर्वीच त्यांच्या मुलींसह शिवसेनेत प्रवेश केला होता.आता मुरजी पटेल यांनी मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीवरून आता अंधेरी पूर्व जागेसाठी युतीतच जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत गेल्या वेळी माघार घेतलेले भाजपचे नेते मुरजी पटेल आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. महायुतीत अंधेरी पूर्वची जागा ही शिवसेनेला (शिंदे गट) सुटण्याची चिन्ह असल्याने पटेल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात भेट घेतली.

अंधेरी पूर्व विधानसभेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत मुरजी पटेल इच्छुक होते. पोटनिवडणुकीत ऋुतुजा लटके यांच्या विरोधात भाजपकडून पटेल यांनी अर्जही भरला होता. प्रचारही सुरु केला होता. पण ऐनवेळी भाजपने पटेल यांना अर्ज मागे घ्यायला लावला. तेव्हापासून पटेल हे नाराज असल्याचं बोललं जात आहे.

ठाण्यात मंगळवारी पटेल यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याबाबत त्यांनी चर्चा केल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणार का, हे काही दिवसातच समजेल. 2015-16 मध्ये भाजपात प्रवेश केलेल्या मुरजी पटेल यांनी 2019 विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती.

अंधेरी पूर्वच्या जागेसाठी एन्काऊटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्विकृती शर्माही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. स्विकृती शर्मा यांनी काही महिन्यापूर्वीच त्यांच्या मुलींसह शिवसेनेत प्रवेश केला होता.आता मुरजी पटेल यांनी मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीवरून आता अंधेरी पूर्व जागेसाठी युतीतच जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde
Girish Mahajan: नाथाभाऊ आता काय करणार? गिरीशभाऊंनी थेट पुरावेच मागितले!

2014ची विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्रपणे लढवली होती. शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके यांनी सुरेश शेट्टी यांचा पराभव केला होता. काँग्रेसच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. भाजपचे उमेदवार सुनील यादव दुसऱ्या क्रमांकावर होते.

शिवसेना आणि भाजप युतीने 2019 ची निवडणूक लढवली होती. आमदार रमेश लटके यांना युतीने उमेदवारी दिली. आता पुन्हा मुरजी पटेल यांनी विधानसभा लढविण्यासाठी तयारी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com