Vinayak Mete : १५ ऑगस्टनंतर आम्ही भेटणार होतो, आता ती भेट होणार नाही ; पंकजा मुंडे भावुक

Vinayak Mete : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी मेटेंच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे आणि मेंटेंच्या आठवणींना सांगितल्या.
Pankaja Munde, Vinayak Mete
Pankaja Munde, Vinayak Mete sarkarnama

बीड : शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे (vinayak mete) यांचे आज (रविवारी) पहाटे अपघाती निधन झाले.मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भाताण बोगद्याजवळ त्यांच्या गाडीचा पहाटे 5.20 वा. अपघात झाला. या दुर्दैवी घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. (vinayak mete passes away)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी विनायक मेटेंच्या दुर्दैवी निधनावर शोक व्यक्त केला आहे.

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी मेटेंच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे आणि मेंटेंच्या आठवणींना सांगितल्या. काही दिवसापूर्वी सागर बंगल्यावर त्यांची भेट झाली होती. १५ ऑगस्टनंतर आम्ही भेटणार असं ठरलं होतं. पण आता ती भेट होणार नाही, अशी खंत पंकजा मुंडेंनी व्यक्त केली.

Pankaja Munde, Vinayak Mete
Vinayak Mete : सामाजिक जीवनात मेटेंनी मोलाची कामगिरी बजावली : शरद पवार

पंकजा मुंडे म्हणाल्या, "राजकीय क्षेत्रात त्यांनी बुद्धी आणि नियोजनाच्या जोरावर पदं मिळवली. मराठा आरक्षणासाठी त्यांनी कामं केली. 52 वर्षांच्या वयात त्यांचं निधन झालं. राजकारणामध्ये हे वय कमी आहे. उमेदीचा त्यांचा काळ होता. एवढा हुशार नेता, बीडचा भूमिपूत्र हरवला, याबद्दल फार वाईट वाटत आहे,"

"मी 22-23 वर्षांची होती. मराठा तरुणांच्या एका संघटनेपासून त्यांची ओळख झाली. तेव्हा पासून त्यांच्यासोबत काम करतेय, खूप प्लॅनिंग त्यांचं चांगलं होतं. काही गोष्टी त्यांना समजायच्या त्या ग्रामीण भागात राहून सगळं काही सांगायचं. माझं नवीन लग्न झालं होतं, त्यावेळी मेटे यांनी सर्व नेत्यांना एकत्र घेऊन कार्यक्रम केला होता. त्या कार्यक्रमाला विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे सुद्धा हजर होते. त्यावेळी मी खूप लहान होते. संघर्ष यात्रेमध्येही ते माझ्यासोबत सहभागी होती, असे पंकजा म्हणाल्या. "सकाळी आलेले फोन नकारात्मक असल्याचे आजपर्यंतचा मला अनुभव आहे," असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, "विनायक मेटे अनेक वर्षे महाराष्ट्र विशेषत: मराठवाड्याच्या सामाजिक जिवनात सक्रीय होते. या क्षेत्रात त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. सामाजिक प्रश्नांसाठी त्यांच्या भूमिका तीव्र होत्या. आपल्या मागण्यांसाठी ते अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडती करत होते," त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे अतिशय नुकसान झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विनायक मेटे यांचे कुटुंबीय व सहकाऱ्यांच्या दु:खात सहभागी असल्याचे शरद पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com