Vinayak Mete : सामाजिक जीवनात मेटेंनी मोलाची कामगिरी बजावली : शरद पवार

Vinayak Mete : विनायक मेटे हे मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी अत्यंत आग्रही होते. मात्र, मराठा समाजाच्या हिताची भूमिका मांडताना इतरांनाही सोबत घेण्याची त्यांची भूमिका होती.
sharad pawar, vinayak mete
sharad pawar, vinayak metesarkarnama
Published on
Updated on

पुणे : "सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी विनायक मेटेंच्या (vinayak mete) निधनाचे वृत्त कळाले. त्यामुळे धक्काच बसला. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात मेटेंनी मोलाची कामगिरी केली आहे.आजची सकाळ ही अत्यंत धक्कादायक आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विनायक मेटे यांचे कुटुंबीय व सहकाऱ्यांच्या दु:खात सहभागी आहे," अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.

शरद पवार म्हणाले, "विनायक मेटे अनेक वर्षे महाराष्ट्र विशेषत: मराठवाड्याच्या सामाजिक जिवनात सक्रीय होते. या क्षेत्रात त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. सामाजिक प्रश्नांसाठी त्यांच्या भूमिका तीव्र होत्या. आपल्या मागण्यांसाठी ते अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडती करत होते," त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे अतिशय नुकसान झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विनायक मेटे यांचे कुटुंबीय व सहकाऱ्यांच्या दु:खात सहभागी असल्याचे शरद पवार म्हणाले.

"विनायक मेटे हे मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी अत्यंत आग्रही होते. मात्र, मराठा समाजाच्या हिताची भूमिका मांडताना इतरांनाही सोबत घेण्याची त्यांची भूमिका होती. सामाजिक प्रश्नांवर सर्वच घटकांच्या हिताची जपणूक त्यांनी केली. विनायक मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतही काम केले आहे. त्याचबरोबर आमदार म्हणून विधीमंडळातही त्यांनी काम केले. मात्र, स्वत:च्या पक्षासाठी ते शेवटपर्यंत अखंड काम करत राहिले," असे पवार म्हणाले.

sharad pawar, vinayak mete
Vinayak Mete : मराठा समाजाचा आवाज हरपला.. मेटेंच्या अपघाती निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा

शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे आज (रविवारी) पहाटे अपघाती निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भाताण बोगद्याजवळ त्यांच्या गाडीचा पहाटे 5.20 वा. अपघात झाला.त्यांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाले, "शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले.ही घटना अतिशय दुःखद आहे.हे दुःख सहन करण्याची शक्ती मेटे परिवाराला मिळावी ही प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com