'जावयाचा बचाव करुन झाला असेल तर राज्याकडे लक्ष द्या'

आपल्या जावयाच्या बचावासाठी मलिक समीर वानखेडे यांच्यावर वाटेल ते आरोप करीत आहेत.
Prasad Lad - Nawab Malik
Prasad Lad - Nawab Malik Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : जावईबापूंचा तसेच स्टारपुत्राचा बचाव करून हौस फिटली असेल तर मंत्री नबाब मलिक (Nawab Malik) यांनी आता राज्यकारभाराकडे लक्ष द्यावे. त्यांच्या सरकारी कार्यालयातील फाईलींवर आता धूळ साचली आहे, अशी खरमरीत टीका भारतीय जनता पक्षाचे राज्य उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड (BJP Leader Prasad Lad) यांनी केली आहे.

आपल्या जावयाच्या बचावासाठी मलिक रोजच्या रोज पत्रकार परिषदा घेऊन वानखेडे यांच्यावर वाटेल ते आरोप करीत आहेत, खोटी कागदपत्रे सादर करीत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळात जावई बचाव मंत्री असे नवे पद निर्माण झाले असल्याची शंका लोकांना येऊ लागली आहे, असा टोमणाही लाड यांनी लगावला.

Prasad Lad - Nawab Malik
पोपट पिंजऱ्यात गेला तर अनेक गोष्टी बाहेर येण्याची भाजपला भिती

इतके दिवस पक्षाच्या, राज्यकारभाराच्या काही बाबी पत्रकारांना सांगणारे मलिक आता फक्त वानखेडे यांच्यावर खोटेनाटे आरोप करण्यात धन्यता मानू लागले आहेत. राज्यापुढील भूकबळी, शेतकरी आत्महत्या, महिलांवरील अत्याचार आदी सर्व प्रश्न संपले असल्याचा त्यांचा समज झाला आहे. महिलांना-गरीबांना छळणारे गुंड, नक्षली, तस्कर, दरोडेखोर, सावकार हे सर्व शत्रू संपून फक्त वानखेडे हे एकच शत्रू उरल्याच्या थाटात मलिक यांची तलवारबाजी सुरु आहे, असा टोलाही लाड यांनी लगावला.

वानखेडे यांची जात, त्यांचा विवाह, त्यांचे पूर्वज, त्यांची नोकरी याबद्दलची कागदपत्रे मलिक यांनी गुप्तचर शॅरलॉक होम्स याच्या तडफेने ज्याप्रकारे शोधली ते पाहून त्यांना केंद्रीय गुप्तचर खात्यात नियुक्ती देण्याची शिफारस आम्ही केंद्राला करणार आहोत. हे कौशल्य भल्याभल्या शोधपत्रकारांकडेही नसते, अशी कबुली अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी आपल्याकडे दिल्याची टिप्पणीही लाड यांनी केली. मलिक यांचा हा वेग कायम राहिला तर वानखेडे हे बांग्लादेशी किंवा रोहिंग्या नागरीक असून त्यांच्याकडे अणुबाँब असल्याचे पुरावेही मलिक सादर करतील, अशा शब्दांत त्यांनी मलिक यांची टर उडवली. पुत्रप्रेमाने अंध झालेला धृतराष्ट्र सर्वांनाच ठाऊक आहे, पण जावईप्रेमाने अंध झालेला सासरा आपण प्रथमच पाहिला आहे. मात्र ही नबाबशाही नसून लोकशाही आहे, जनसेवेसाठी आपल्याला लोकांनी निवडून दिल्याचे भानही मलिक यांनी ठेवावे, असेही लाड यांनी बजावले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com