पोपट पिंजऱ्यात गेला तर अनेक गोष्टी बाहेर येण्याची भाजपला भिती

दाढीवाला काशिफ खान (Kashif Khan) याचा ही मलिकांनी पुनरुच्चार केला.
नवाब मलिक
नवाब मलिक सरकारनामा
Published on
Updated on

मुंबई : काल आर्यन खानला (Aryan Khan) जामीन मिळाल्यानंतर काल दूपारी आणि रात्री सलग दोन ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दोन ट्विट करत आपण अनेक गौप्यस्फोट करणार असल्याचे आणि आक्रमक होणार असल्याचे म्हंटले होते. त्यानंतर त्यांनी आता पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत अनेक आरोप तसेच खुलासे केले आहेत. समीर वानखेडे (Sameer Wankhede) हा पोपट असून त्याचा जीव भाजप पक्षामध्ये आहे. पोपट अडकला आहे म्हणूनच भाजप तडफडत आहे. कारण पोपट पिंजऱ्यात गेला तर अनेक गोष्टी बाहेर येण्याची भाजपला भिती आहे असा आरोप त्यांनी केला.

मलिक म्हणाले, जर कालचा घटनाक्रम बघितला तर तो बदलला आहे. २ तारखेला जो व्यक्ती आर्यन खानला हाताला धरुन नेत होता तो आता तुरुंगात आहे. जो व्यक्ती या प्रकरणाचा तपास करत होता, आर्यन खानला जामीन मिळायला नको म्हणून प्रयत्न करत होता, तो काल न्यायालयात मुंबई पोलिसांनी सुरु केलेली चौकशी थांबवून सीबीआय किंवा एनआयएकडे द्यावी यासाठी याचना करत होता. म्हणजेच पुर्ण घटनाक्रम बदलला आहे. पकडणारे आता, बचावाचा रस्ता शोधत आहेत. म्हणून मी काल म्हंटले होते की पिक्चर अभी बाकी है. जमीन मिळणे हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. मात्र एनसीबीने जामीन मिळायला नको यासाठी अनेक पळवाटा शोधल्या.

नवाब मलिक
आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर नवाब मलिक म्हणाले..

वानखेडे आरोप करत आहेत की, मी त्यांच्या दिवंगत आईला यामध्ये घेत आहे, पण मी त्यांचे नाव कुठेही घेतलेले नाही. मी जे जन्म प्रमाणपत्र शेअर केले होते, त्यात केवळ त्यांच्या वडिलांचे नाव होते. मी त्यांच्या बहिणीचा उल्लेख केला तो फ्लेक्चर पटेल यांच्या लेडी डॉनचा उल्लेख केल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यांच्या पहिल्या बायकोचा फोटो देखील त्यांच्याच इच्छेमुळे सार्वजनिक केला होता. त्यांच्या आताच्या पत्नीचे देखील मी कुठेही नाव घेतलेले नाही. किंवा त्यांच्यावर काही भाष्य केलेले नाही. मला वाटत हि लढाई कोणच्याही कुटुंबाविरोधात, किंवा कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात नाही. ही लढाई केवळ खोट्या लोकांच्या विरोधात आहे असेही मलिक यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, स्पेशल छब्बीसचे एक पत्र मी एनसीबीच्या महासंचालकांना लिहीले आहे. आधी सांगितले गेले की याची दखल घेतली जाईल, पण नंतर तक्रारदाराचे नाव नसल्यामुळे त्याची दखल घेतली नाही. पण याची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. कारण यातील २२ नंबरचे प्रकरण हे अत्यंत महत्वाचे आहे. कारण यात पालघरमधील एका नायजेरीयन व्यक्तीला फसवण्यात आले आहे. त्यात जो कांबळे नावाचा साक्षीदार आहे, त्याने मान्य केले आहे की एनसीबीने माझ्यासमोरच छापे टाकले, पण जे नायजेरीयन ड्रग पेडलर होता तो पळून गेला.

त्यानंतर तिथल्या नायजेरीयन व्यक्ती कुठे राहतात असे विचारण्यात आले, त्यानंतर एनसीबी खारघर मधील एका किचनमध्ये गेले. तिथला डिव्हीआर तोडून दोन जणांना ताब्यात घेवून आले. यातील ज्याचे वय कमी होते त्याला सोडून देण्यात आले आणि एका नायजेरीयन व्यक्तीला यात फसवण्यात आले. आज तो तुरुंगात आहे. त्याच्याकडून देखील खोट्या कागदांवर सह्या घेण्यात आल्या. याबाबत आपण एनसीबीला पुन्हा एकदा पत्र लिहुन स्पेशल छब्बीसचा तपास सुरुच ठेवावा अशी मागणी करणार असल्याचे मलिक म्हणाले.

नवाब मलिक
क्रूझ पार्टीतील 'दाढीवाला' आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया वानखेडेंचा खास दोस्त !

दाढीवाला काशिफ खान याचा ही मलिकांनी पुनरुच्चार केला. त्याला अटक का नाही? तो अनेक ठिकाणी अमली पदार्थ, महिलांशी संबंधीत उद्योग चालवतो, आणि हाच खान समीर वानखेडेचा मित्र आहे. ते म्हणाले, या प्रकरणात जितके आत जाईल तितक्या नव्या घटना पुढे येत आहेत. नवाब मलिकला लिहण्यापासून, बोलण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न झाला. हा अधिकारी नेमका काय विचार करत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालत आहे. परवापर्यंत ज्या मुंबई पोलिसांकडून संरक्षणाची मागणी करत होता तोच काल मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवत होता. त्यामुळेच अशा अनेक घटना आहे ज्यामुळे तो घाबरला आहे.

काल मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले की, मी मराठी आहे म्हणून तुम्ही आम्हाला मदत करा. पण महाराष्ट्रात कुठेही जाती, धर्माच्या आधारवर भेदभाव होत नाही. मराठी अस्मिता नावाखाली जे अपेक्षा आहे ते होणार नाही. न्याय समोर जात धम भाषा चालत नाही. क्रांती ताई तुमचा नवरा अश्या लोकांबरोबर आहे जे महाराष्ट्राला बदनाम करत आहे. असाही टोला त्यांनी लगावला. सोबतच पोपट पिंजऱ्यात गेला तर अनेक गोष्टी बाहेर येण्याची भाजपला भिती आहे, असे म्हणत पाठिंबा देणाऱ्या भाजप नेत्यांनाही मलिकांनी सुनावले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com