भाजपला बरबाद करण्याचा इशारा देणाऱ्या राऊतांना लाडांचे चोख प्रत्युत्तर

Sanjay Raut| Prasad lad| BJP-Shivsena संजय राऊत यांनी स्वत:ची झोप वाचवावी,
Prasad Lad- Sanjay Raut
Prasad Lad- Sanjay Rautsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज संध्याकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यासाठी शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. काही दिवसांत भाजपचे साडेतीन लोकं तुरूंगात जाणार असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. आम्ही खूप सहन केले. आता आम्हीच तुम्हाला बरबाद करू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे शिवसेना आज नेमका कोणावर, काय हल्लाबोल करणार आणि शिवसेनेच्या हिट लिस्टवर कोण कोण असणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.(Shiv Sena vs BJP)

Prasad Lad- Sanjay Raut
तर धनंजय मुंडे तुरूंगात असते! करूणा शर्मांनी सांगितलं कारण..

यावर भाजप नेते प्रसाद लाड (BJP leader Prasad Lad) यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर पलटवार केला आहे. "भाजप अशा खोट्या धमक्यांना घाबरत नाही. झोप लागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मुंबईतल्या अनेक ठिकाणांवर आज आज एनआयए आणि ईडीकडून छापेमारी (ED raids in Mumbai) सुरू आहे, त्यात किती लोकांची झोप उडणार आहे हे संध्याकाळी 4 पूर्वी संजय राऊत यांना कळेल. त्यामुळे संजय राऊत यांनी स्वत:ची झोप वाचवावी, असे इशाराच प्रसाद लाड यांनी दिला आहे. तसेच, संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेला आम्हीही चोख उत्तर देऊ. राऊत काय तोफ असतील तर आम्ही सुद्धा सक्षम आहोत.संजय राऊत कोणाची नावे बाहेर काढतात, याचीच उत्सुकता आहे.

हसिना पारकरच्या मुंबईतील घरासह इतर ठिकाणीही इडीची छापेमारी सुरू आहे. इतक्या मोठ्या कारवाईची तयारी दहा-बारा दिवस आधीच करावी लागते. त्यामुळे संजय राऊत हे पत्रकार परिषद घेणार म्हणून छापेमारी सुरु आहे, असं काही नाही. केंद्रीय तपास यंत्रणा आपल्या अधिकारानुसार जर कारवाई करत एखाद्या राजकीय नेत्यापर्यंत पोहोचत असतील तर तपास यंत्रणा चुकीचं काम करतेय का? असा सवालही प्रसाद लाड यांनी केला. यंत्रणेचा गैरवापर करत भाजपच्या लोकांना ज्या प्रकारे त्रास दिला जात आहे, हे महाराष्ट्रातील जनता पाहत आहे, असंही प्रसाद लाड म्हणाले.

तसेच, राजकारणात सत्तेचा दुरोपयोग करुन तुम्ही काही गैरकृत्य केलं नसेल तर घाबरण्याचं कारण नाही. आम्हीपण आम्ही घाबरत नाही. आम्ही कोणतंही चुकीचं काम केलं नसेल तर आम्ही तपास यंत्रणेला आम्ही न्यायालयाच्या माध्यमातून उत्तर देऊ, असंही प्रसाद लाड यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com