दरेकरांना घातपात? एकाच महिन्यात तिसऱ्यांदा गाडीला अपघात

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या ताफ्यातील गाडीला आज मुंबईत अपघात झाला.
Pravin Darekar Accident
Pravin Darekar Accident Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या ताफ्यातील गाडीला आज मुंबईत अपघात (Accident) झाला. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर हा अपघात घडला. सुमारे महिनाभरात दरेकर यांच्या गाडीचा अपघात होण्याची ही तिसरी वेळ आहे. यामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त होत असून, या प्रकरणी दरेकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे तक्रार करणार आहेत.

दरेकरांच्या गाडीला अपघात होताच त्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, भाजपच्या कामासाठी मी राज्यभरात फिरत असतो. महिनाभरात माझ्या गाडीला झालेला हा तिसरा अपघात आहे. काही दिवसांपूर्वी मालेगावमध्ये आणि त्यानंतर खंडाळ्यात माझ्या गाडीचा अपघात झाला होता. प्रत्येक वेळी गाडीसमोर दुचाकीस्वार आल्याने अपघात घडला आहे. आजही मुंबईत गाडीसमोर अचानक दुचाकीस्वार येऊन अपघात घडला. त्यामुळे यात मला घातपाताचा संशय येत आहे. या प्रकरणी मी चौकशीची मागणी करणार आहे. यासाठी मी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहणार आहे.

Pravin Darekar Accident
हिजाबचा वाद तमिळनाडूत! विरोध करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला दाखवला बाहेरचा रस्ता

नुकताच दरेकर यांच्या ताफ्यातील गाडीला पुणे-बंगळूर महामार्गावरील परगाव-खंडाळा येथे अपघात झाला होता. सातारा जिल्ह्याच्या हद्दीत हा अपघात घडला होता. या अपघातात भाजप नेते दरेकरांना इजा झालेली नव्हती. दरेकर हे त्यावेळी सातारा दौऱ्यावर होते. आता पुन्हा त्यांच्या गाडीला अपघात झाल्याने यामागे घातपात असल्याचा संशय भाजप नेते व्यक्त करू लागले आहेत. एकाच महिन्यात तीन वेळा एकाच प्रकारे अपघात घडल्याने याबद्दल आता अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com