आर्यनच्या जामिनासाठी भाजप नेत्यानं केली प्रार्थना अन् शुभेच्छाही...

जामीन अर्जावर विशेष NDPS कोर्टात आज निकाल दिला जाणार आहे.
Aryan Khan
Aryan Khan

मुंबई : कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs case) प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानसह (Aryan Khan) इतर आरोपींच्या जामीन अर्जावर विशेष NDPS कोर्टात आज निकाल दिला जाणार आहे. आर्यनला दोन ऑक्टोबर रोजी अटक केली आहे. पण ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नबाव मलिक यांनी केला आहे. त्यावर भाजप नेत्यांकडून सडकून टीका करण्यात आली होती. आता एका भाजप नेत्यानंतरच आर्यनच्या जामिनासाठी प्रार्थना केली आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुखचा 23 वर्षीय मुलगा आर्यन खान याला एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी मुंबई किनाऱ्यावरील कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर रेव्ह पार्टी छाप्यादरम्यान अटक केली होती. यानंतर 7 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने आर्यनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सध्या तो मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. भाजपचे नेते राम कदम यांनी त्यासाठी प्रार्थना केली आहे.

Aryan Khan
अमरिंदरसिंग यांचं ठरलं! भाजपसोबत जाणार पण एका अटीवर...

कदम यांनी ट्विट करून आर्यनला जामीन मिळावा, अशी प्रार्थना केली आहे. ते म्हणतात, प्रार्थना आहे की आज आर्यन खानला जामीन मिळावा. संविधान अन् कायद्याप्रमाणे जामीन मिळणे हा एक मूलभूत अधिकार आहे. ही लढाई कोणा एका व्यक्तीच्या विरोधातील नाही तर अखंड मानव जातीची ड्रग्ज विरोधी लढाई आहे. अपेक्षा होती की महाराष्ट्र सरकार निदान या खतरनाक ड्रग्ज प्रकरणात ड्रग्ज माफियाच्या विरोधात उभे राहतील. मात्र वसूलीचा प्रभाव स्पष्ट दिसला, अशी टीकाही राम कदम यांनी केली आहे.

मेहबूबा मुफ्ती यांनी देखील याचा आगामी निवडणुकीसाठी पुरेपूर उपयोग केला. जी ड्रग्जची नशा आपल्या सर्व युवकांना बरबाद करू शकते, त्याविरोधात सर्व पक्ष आणि मानव जात एकत्र का येऊ शकत नाहीत. हे दुःख आहे आता बदललेल्या भारतात कोणी श्रीमंत गरीब, नेता, अभिनेता असो कायद्याच्या समोर सर्व समान आहेत़, असं सांगत कदम यांनी आर्य़नला शुभेच्छाही दिल्या आहेत.

भविष्यात आर्यनने बदनामीचे कारण ठरलेल्या ड्रग्जच्या विरोधात प्रखर लढाई उभी करून युवकांना ड्रग्ज पासून दूर करण्यासाठी काम करून संकटाचे संधीत रूपांतर करण्यासाठी एक देशवासीय या नात्याने शुभेच्छा, असं कदम यांनी म्हटलं आहे. आर्यन खानसह अटक केलेल्या इतर सात जणांमध्ये मुनमुन धामेचा, अरबाज मर्चंट, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, गोमित चोप्रा, नुपूर सतिजा आणि विक्रांत छोकर यांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com