राजकारण हा आजार असेल तर त्याचं मूळ 'मातोश्री' ; सदाभाऊंचा मुख्यमंत्र्यांना टोला

सदाभाऊ खोत (sadabhau khot ) राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं आहे.
sadabhau khot,Uddhav Thackeray
sadabhau khot,Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

मुंबई: मातोश्री, हनुमान चालीसा, राणा दाम्पत्याला अटक, किरीट सोमय्या-शिवसेना वाद आदी विषयावर सध्या राज्याचे राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. भाजपचे नेते, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (sadabhau khot ) यांनी राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं आहे.

सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (thackeray government) यांच्यावर निशाणा साधला आहे. सदाभाऊंनी टि्वट करीत ठाकरे सरकारवर टीका केली आहे, तर भाजपचे नेते, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलं आहे.

“महाराष्ट्रातील सध्याचं राजकीय सूड नाट्य पाहता; राज्यातील जनतेसाठी राजकारण हा आजार असेल तर त्याचं मूळ मातोश्री आहे आणि औषध देवेंद्र फडणवीस सरकार आहे.” असे टि्वट सदाभाऊ खोत यांनी केले आहे.

sadabhau khot,Uddhav Thackeray
सोमय्यांवरील हल्ल्याची गृहमंत्रालयाकडून चिंता व्यक्त ; ठाकरे सरकारची गंभीर दखल घेणार

'मातोश्री'विरोधात पंगा घेणाऱ्या राणा दाम्पत्याची काल न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली १५३ अ अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर खार पोलिसांनी त्यांना शनिवारी अटक केली होती. रविवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यायालयाने राणांना १४ दिवसांनी पोलीस कोठडी सुनावली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोघांच्या जामिनावर आता 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयानं त्यांच्या जामिनावर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यानंतर रवी राणा यांची आर्थर रोड कारागृहात तर नवनीत राणा यांची भायखळा कारागृहात रवानगी करण्यात आली.

sadabhau khot,Uddhav Thackeray
'मैं झुकेगा नहीं..' म्हणत 'मातोश्री' समोर तळ ठोकणाऱ्या आजीला मनसेनं दिले धन्यवाद!

माजी खासदार किरीट सोमय्या आणि भाजपच्या शिष्टमंडळाने आज सकाळी केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची त्यांनी भेट घेतली. या भेटीत सोमय्यांनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीबाबतची माहिती गृहसचिवांना दिली आहे.

किरीट सोमय्या म्हणाले,''गृहसचिवांना राज्यातील ठाकरे सरकारच्या (Uddhav Thackeray) मनमानी कारभाराची माहिती दिली आहे. याबाबत गृहसचिवांनी चिंता व्यक्त केली आहे. येत्या दोन दिवसात केंद्रीय गृहमंत्रालय या प्रकरणाची गंभीर दखल घेणार आहे.ठाकरे सरकारची चैाकशी करण्यासाठी गृहसचिवांकडून लवकरच महाराष्ट्रात पथक पाठविण्यात येणार आहे,''

सोमय्या म्हणाले,''ठाकरे सरकार आपल्या अधिकारांचा गैरवापर करीत आहेत. माझ्या विरोधात खोटी तक्रार पोलीसांकडे केली आहे. मी न केलेली तक्रारही माझ्या नावाने ठाकरे सरकारनं खपवली आहे. माझ्यावर हल्ला झाला त्यांचे सीसीटीव्ही फुटेज मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी गायब केली आहेत,''

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com