भाजपला धक्का; माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक राष्ट्रवादीत

नाईक यांनी बुधवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली.
Shivajirao Naik will Join NCP
Shivajirao Naik will Join NCPSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील भाजप नेते आणि माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक (Shivajirao Naik) हे अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. नाईक यांनी बुधवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant Patil) यांची भेट घेतली. वाढदिवसाचे औचित्य साधून झालेल्या भेटीत नाईक यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झालं.

नाईक हे दोन एप्रिल रोजी राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करतील, असे समजते. यादिवशी शिराळ्यात शेतकरी मेळाव्ये आयोजन करण्यात आले आहे. याच मेळाव्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत नाईक यांचा राष्ट्रवादीत अधिकृतपणे प्रवेश होईल. बुधवारी झालेल्या बैठकीला आमदार मानसिंगराव नाईक (Mansingrao Naik), रणधीर नाईक, सत्यजित नाईक, अभिजित नाईक उपस्थित होते. नाईक हे मागील दोन वर्षांपासून भाजपवर नाराज आहेत. 2014 मध्येही त्यांना मंत्रिपद न दिल्यानं उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.

Shivajirao Naik will Join NCP
budget 2022:विरोधक आक्रमक होणार ; आघाडी सरकारची रणनिती तयार

२०१४ मध्ये नाईक यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आणि आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी मंत्री नितीन गडकरी यांनी मंत्रीपद देण्याचे व २०१९ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक आमदार द्या, आम्ही तालुक्याला दोन मंत्री देतो असे आश्वासन दिले. मात्र, ते आश्वासन भाजपने पाळले नाही. उलट २०१९ ला अंतर्गत गटबाजीमुळे नाईक यांचा पराभव झाला. सत्यजित देशमुख यांची आमदारकी हे ही आश्वासनच राहिले. दरम्यानच्या काळात नाईक यांच्या संस्था अडचणीत असताना त्यांना भाजपकडून ठोस मदत मिळाली नाही. एकीकडे राजकीय खच्चीकरण आणि दुसरीकडे अडचणीत आलेल्या संस्था यामुळे नाईक यांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत.

Shivajirao Naik will Join NCP
...आता शिवसेनाही राज्यपलांच्या विरोधात रस्त्यावर उतरली!

राजकारण करण्यासाठी संस्था सक्षम असल्या पाहिजेत. नाईक यांच्या उद्योग समूहातील दीड हजारवर कर्मचाऱ्याचा व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाची वाताहत रोखणे गरजेचे आहे. याची जाणीव ठेवत जो आपल्या संस्थाना आर्थिक पाठबळ देईल त्याच्या सोबत जाणे हाच एकमेव पर्याय नाईक यांच्या समोर होता. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. शिवाजीराव नाईक व मानसिंगराव नाईक यांच्यात जवळीकता निर्माण झाली असल्याचीही चर्चा आहे. आम्हाला राजकारणा पेक्षा अडचणीत असणाऱ्या संस्था पूर्ण क्षमतेने कार्यरत करणे गरजेचे आहे. या संस्थावर दीड हजारावर कामगारांचे त्यांच्या कुटुंबाचे भवितव्य अवलंबून आहे. आम्ही भाजपवर ही नाराज नाही, मात्र प्राप्त परिस्थिती नुसार निर्णय घेवू, असं नाईक काही दिवसांपूर्वीच म्हणाले होते.

शिवाजीराव नाईक यांचा राजकीय व जिल्हापरिषदेचा ११ वर्षाचा अनुभव पाहता ते राष्ट्रवादीत आले तर त्यांना वरिष्ठ पातळीवर चांगली संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानसिंगराव नाईक यांच्यासाठी हा मतदार संघ सुरक्षित राहील. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती, बाजार समिती व शिराळा नगरपंचायत या ठिकाणी राष्ट्रवादीचे वर्चस्व राहील. रणधीर नाईक यांच्या राजकीय वाटचालीचा व शिराळा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचा मार्ग सुखकर होईल, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com