...आता शिवसेनाही राज्यपलांच्या विरोधात रस्त्यावर उतरली!

राज्यपालांच्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या विधानाने शिवसेनेची संतप्त प्रतिक्रीया आली.
Shivsena agitaion in Nashik
Shivsena agitaion in NashikSarkarnama

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून अवमान केल्याप्रकरणी शिवसेनेतर्फे (Shivsena) बुधवारी शालिमार येथील कार्यालयासमोर रास्ता रोको केला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governer Bhagatsingh Kosjiyari) यांचा निषेध केला. रास्ता रोको आंदोलनप्रकरणी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

Shivsena agitaion in Nashik
केंद्र सरकार ठामपणे कांदा उत्पादकांच्या पाठींशी राहील!

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याच्या तीव्र प्रतिक्रीया राज्यभर उमटल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे सबंध देशासाठी महान नायक आहेत. संवैधानिक पदावर बसलेल्या नेत्यांनी त्यांच्याबाबत विधान करताना पुरेसा अभ्यास असल्याशिवाय करू वक्तव्य करू नये. या संकेताचा राज्यपालांनी भंग केला आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुंविषयी विधान केले. त्याला काहीही एैतिहासीक प्रमाण, संदर्भ नाहीत. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश गेला आहे. त्यासाठी त्यांनी माफी मागून आपले विधान मागे घ्यावे अशी मागणी यावेळी केली.

Shivsena agitaion in Nashik
मी सेना मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची चोपडी खोलेल!

शहरातील पक्षाच्या कार्यलयाबाहेर शालीमार चौकात मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणा दिल्या. निषेधाचे फलक फडकवले. या आंदोलनाने या वर्दळीच्या भागात वाहतुकीची कोंडी झाली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, उपनेते सुनील बागूल, माजी आमदार वसंत गिते, दत्ता गायकवाड, अजय बोरस्ते, विलास शिंदे, महिला आघाडीच्या प्रेमलता जुन्नरे, शोभा मगर आदींच्या नेतृत्वाखाली शालिमार चौकातील शिवसेना कार्यालयासमोर दुपारी रास्ता रोको आंदोलन करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध केला. राज्यपाल चलेजाव, राज्यपाल हाय, हाय, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांचा निषेध असो, अशा जोरदार घोषणा देत आणि कोश्यारी यांच्या निषेधाचे फलक फडकाविले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशिवाय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com