University Degree Certificate Mistake : विद्यापीठाच्या बोधचिन्हावरील स्पेलिंग चुकले; नाचक्कीनंतर चार उपकुलसचिवांवर कारवाईचा बडगा

Mumbai University spelling mistake name "Mumbai" degree certificate logo transfer four deputy registrars : मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावरील विद्यापीठाच्या बोधचिन्हावरील मुंबई नावातील स्पेलिंगमध्ये चूक झाल्याने चार उपकुलसचिवांव बदलीची कारवाई.
Mumbai University
Mumbai UniversitySarkarnama
Published on
Updated on

Mumbai University News : मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांना प्रदान केलेल्या पदवी प्रमाणपत्रावरील विद्यापीठाच्या बोधचिन्हावरील मुंबई नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक झाल्याचे चांगलीच नाचक्की झाली.

याप्रकरणी विद्यापीठाने कारवाईचा बडगा उचलत चार उपकुलसचिवांवर कारवाई करत त्यांच्या बदल्या केल्या आहेत. विद्यापीठाच्या या कारवाईमुळे प्रशासनात चांगलीत खळबळ उडाली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेवर केलेल्या विधानावरून राज्यात रणकंदन सुरू आहे. विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे. यातच मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावरील विद्यापीठाच्या बोधचिन्हातील मुंबई नावातील स्पेलिंगमध्ये झालेल्या चुकीवरून प्रशासन खडबडून जागे झाले.

Mumbai University
Dhananjay Munde On Uddhav Thackeray : दोन महिन्यांपासून फोटो फडणवीसांकडे होते, अधिवेशन काळात बाहेर कसे? ठाकरेंना 'टायमिंगवर' संशय

मुंबई (Mumbai) विद्यापीठाचा पदवीदान समारंभ सात जानेवारीला झाला होता. या समारंभात 1 लाख 64 हजार विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यातील अनेक पदव्यांवरील विद्यापीठाच्या बोधचिन्हातील मुंबईच्या नावातील स्पेलिंगमध्ये चूक झाल्याचा प्रकार घडला.

Mumbai University
Uddhav Thackeray Video: 'हा संघाचा छुपा अजेंडा, अनाजी पंत...', उद्धव ठाकरे भय्याजी जोशींवर कडाडले

विद्यापीठाने प्रमाणपत्र छपाई करणाऱ्या कंत्राटदाराकडून या चुका झाल्याचे सांगितले आहे. ही चुकीची प्रमाणपत्रे दिल्याने ती माघारी घेण्याची कार्यवाही विद्यापीठावर ओढवली. विद्यापीठाने सर्व शैक्षणिक विभागांना ही पत्र पाठवून सर्व पदवी प्रमाणपत्र माघारी करण्यास सांगितले आहे. तसेच सर्व प्रमाणपत्र नव्याने पुन्हा छापून देण्याचा निर्णय घेतला आहे.

या उपकुलसचिवांवर झाली कारवाई

चुकीच्या प्रमाणपत्रांमुळे मोठ्या टीकेला विद्यापीठाला सामोरे जावे लागले. विद्यापीठाने यावरून अधिकाऱ्यांविरुद्ध बदल्याची कारवाई केली. महाविद्यालय संलग्नता आणि विकास विभागाचे उपकुलसचिव दीपक वसावे यांची बदली फोर्ट प्रशासन व निवडणूक विभागात, परीक्षा व मूल्यमापन विभागाचे उपकुलसचिव हिम्मत चौधरी यांची बदली महाविद्यालय संलग्नता व विकास विभागात, फोर्ट प्रशासन विभागाच्या उपकुलसचिव सुजाता नवाले यांची बदली प्रवेश, नाव नोंदणी, पत्रात आणि स्थलांतरण विभागात, तर निवडणूक विभागाचे उपकुलसचिव विकास डवरे यांची बदली गुण, प्रमाणपत्र विभाग आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळात केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com