BJP News: ठाणे लोकसभा मतदारसंघावरील दाव्यानंतर BJP करणार जनसहभागातून 'जाहीरनामा' तयार

Maharashtra Politics: युतीचा धर्मही पाळणार ?
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

पंकज रोडेकर

Thane: ठाणे लोकसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट दावा करत असताना, आता भाजप ही ॲक्शन मोडवर आली आहे. या मतदारसंघाच्या दावेदारीत मागे राहू नये म्हणून भाजपने अनोखा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याला जाहीरनामा असे संबोधून जनसहभागातून तो तयार करण्यावर भर देण्याचे ठरवले आहे.

गुरुवारी ठाणे शहर भाजप पक्ष कार्यालयात www.thaneloksabha.in या पोर्टल चे उद्घाटन आणि सादरीकरण करत, त्या मतदारसंघातील नागरिकांना त्या संदर्भात आवाहन केले आहे. त्यामुळे हा मतदारसंघ नेमका कोण राखणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. मात्र एकीकडे दावेदारीची तयारी करताना भाजपने दुसरीकडे युतीचा धर्मही पाळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपचे लोकसभा संयोजक विनय सहस्रबुद्धे यांनी यावेळी सांगताना, ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर ही शहरे आता मुंबईची उपग्रह शहरे राहिलेली नाहीत. त्यांची- त्यांची स्वतः ची एक ओळख आहे आणि मुंबई शहराचा रुबाब आणि झळाळी अनेक संदर्भात या तिन्ही शहरांवर अवलंबून आहे.

मुंबईचा विकास आता दक्षिणेकडून उत्तरेकडे सुरू आहे. ही गोष्ट वांद्रा-कुर्ला कॉम्लेक्सच्या विकासामुळे सिद्ध झाली आहे. त्या दृष्टीने मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणानेही आता ठाणे-नवी मुंबई-मीरा-भाईंदर च्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. त्याच दृष्टीने मुंबई आणि ठाणे, नवी मुंबई व मीरा-भाईंदरचे परस्परावलंबित्व लक्षात घेऊन अमृतकाळातील ठाणे लोकसभा क्षेत्राच्या विकासाचा विचार व्हायला हवा, असे यावेळी त्यांनी सांगितले.

BJP
Jitendra Awhad : आव्हाडांसाठी मुघल अन् अफझलखान हेच देव; श्रीराम कोण होते, ते त्यांना ज्ञात नसावे...

ठाणे,नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर या तिन्ही शहरांचा या ठिकाणच्या उद्योगांमुळे एक जागतिक महत्त्व आहेच. पण हे महत्त्व या तिन्ही शहरांच्या संरचनात्मक आणि सांस्कृतिक विकासाशी ही निगडित आहे. त्यामुळेच या तिन्ही शहरातील नागरिकांनी आपले विचार, अभिनव सूचना आणि आपली शहर विकासाची दृष्टी भाजपाच्या या पोर्टलद्वारे मांडावी जेणेकरून लोकतांत्रिक पद्धतीने आणि सर्वसमावेशी विचार करुन पक्षाला आपला ठाणे लोकसभेचा जाहीरनामा तयार करता येईल असे आवाहन भाजप नेत्यांनी यावेळी केले.

Edited by: Mangesh Mahale

BJP
Maharashtra Government: आताच अर्ज करा... सरकारी नोकरीची संधी, 670 जागांची बंपर भरती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com