Maharashtra Government: आताच अर्ज करा... सरकारी नोकरीची संधी, 670 जागांची बंपर भरती

Department of Soil and Water Conservation : महिलासांठी 30%, खेळाडूंसाठी 5%, अनाथांसाठी 1%, दिव्यांगांसाठी 4% पदे राखीव असणार आहेत.
Maharashtra Government
Maharashtra GovernmentSarkarnama
Published on
Updated on

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. राज्य सरकारच्या मृद व जलसंधारण विभागाने नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जलसंधारण विभागाच्या या नोकरभरतीमध्ये तब्बल 670 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

राज्य सरकारच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली ही नोकरभरती छत्रपती संभाजीनगर आयुक्त कार्यालयाच्या वतीने घेण्यात येत आहे. या नोकरभरतीमध्ये संभाजीनगरच्या जलसंधारण आणि जिल्हा परिषद यंत्रणेमधील गट ब संवर्गातील ‘जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) पदाच्या एकूण 670 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

महिलासांठी 30%, खेळांडूसाठी 5%, अनाथांसाठी 1%, दिव्यांगांसाठी 4% पदे राखीव असणार आहेत, तसेच आरक्षित जागांचा तपशील जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी https:// swcd. maharashtra. gov. in या संकेतस्थळावर भेट द्यावी अथवा या नोकरभरतीची सविस्तर जाहिरात ऑनलाईन पाहावी.

Maharashtra Government
Malegaon Mahanagarpalika: मालेगाव महापालिकेत नोकरीची संधी; 'या' पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु...

अर्ज करण्याची प्रक्रिया

मृद व जलसंधारण विभागाच्या या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https:// swcd. maharashtra. gov. in या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करून घ्यावे, त्यानंतर आवश्यक माहितीसह आपला अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 10 जानेवारी 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करणे गरजेचे आहे. मुदतीनंतर उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या भरतीसाठी अर्ज करताना खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये परीक्षा शुल्क आकराले जाणार आहे, तर मागासवर्गीयांसाठी 900 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. हे शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पात्रता आणि निकष

  1. जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) या पदाच्या भरतीसाठी उमेदवार हा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी प्राप्त असावा.

  2. अर्ज करताना खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय हे 19 डिसेंबर 2023 पर्यंत 19 ते 40 वर्षांपर्यंत असावे, तर मागासवर्गीय, खेळाडूंसाठी वयोमर्यादा ही 45 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

  3. दिव्यांगांसाठी हीच वयोमर्यादा 47 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. या नोकरभरतीसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे.

  4. परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येणार असून एकूण 200 गुणांची परीक्षा असेल. ऑनलाईन घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी उमेदवारांना 2 तासांचा वेळ दिला जाणार आहे.

  5. परीक्षेसाठी राज्यातील उपलब्ध करून देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रापैकी 3 केंद्रांची निवड उमेदवारांना करणे आवश्यक आहे. त्यापैकी एका ठिकाणी उमेदवारीची परीक्षा पार पडेल. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी संकेतस्थळावरील सविस्तर जाहिरात वाचावी.

निवड प्रक्रिया

  • पात्र उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे आणि गुणवत्तेनुसार पात्र ठरवले जाणार आहे. यासाठी उमेदवाराने लेखी परीक्षेत पात्र होण्यासाठी किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.

  • तोंडी परीक्षा घेतली जाणार नाही. त्यानंतर पात्र ठरलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांना उमेदवारांना कागदपत्र पडताळणीकरिता बोलावण्यात येणार आहे. त्यासंबंधीची यादी जलसंधारण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

  • कागदपत्र पडताळणीनंतर पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

या भरतीचा संपूर्ण तपशील जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी https://cdn.digialm.com//per/g01/pub/726/EForms/image/ImageDocUpload/12/1118256851397431029576.pdf ही जाहिरात लिंक तपासावी.

Edited by: Mangesh Mahale

Maharashtra Government
Banks loss News : राज्यभरातील 29 बँका अडचणीत, 511 कोटींचा तोटा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com